अमेरिका युद्धग्रस्त युक्रेनला शस्त्रसामग्री देणार

युक्रेनला ८२ कोटी डॉलरची नवी शस्त्रसामुग्री देण्याची घोषणा अमेरिकेने शुक्रवारी (ता. १) रात्री केली.
US supply arms to war-torn Ukraine Washington
US supply arms to war-torn Ukraine WashingtonSakal

वॉशिंग्टन : युक्रेनला ८२ कोटी डॉलरची नवी शस्त्रसामुग्री देण्याची घोषणा अमेरिकेने शुक्रवारी (ता. १) रात्री केली. रशियाच्या दीर्घ पल्ल्याच्या हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी नवी क्षेपणास्त्र प्रणाली व तोफखाना रडारचा समावेश आहे. रशियाने अलीकडच्या काही दिवसांत युक्रेनवर डझनभर क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच एकाच वेळी काही तास सतत गोळीबार करून युक्रेनच्या सैन्याचा पाडाव केला आहे. साधनसामुग्री व मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आणखी दारूगोळा व अत्याधुनिक प्रणालीची मदत लवकरात लवकर करण्याचे जाहीर आवाहन युक्रेनी नेत्यांनी पाश्‍चिमात्य देशांना केले होते.

युक्रेनला मदत करण्यासाठी ८.८ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्रे व सैनिकी प्रशिक्षण देण्यास अमेरिका कटिबद्ध असून सात अब्ज डॉलरची मदत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जाहीर केली आहे. दरम्यान, रशियाने काल पहाटे युक्रेनमधील ओडेसा शहरावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातील मृतांची संख्या २१ झाली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार आतापर्यंत तीन मुलांसह सात जणांचा बचाव करण्यात आला. हा हल्ला म्हणजे रशियाचा दहशतवाद असल्याचे ओडेसाच्या गव्हर्नरने म्हटले आहे. स्नेक आयलंडवर रशिया फॉस्फोरस बाँबचे हल्ले करीत असल्याचा आरोप युक्रेनच्या सैन्याने केला आहे. हल्ल्याच्या एक दिवस आधी स्नेक आयलंड सोडण्याचा निर्णय रशियाने जाहीर केला होता.

चिनी कंपन्यांची मदत

रशियाने युक्रेनमधील युद्धाला चीनमधील कंपन्या व संशोधन संस्था समर्थन देत असल्याचा आरोप अमेरिकेने केला असल्याचे ‘यूएस ब्युरो ऑफ इंडस्ट्री अँड सिक्युरिटी’च्या (बीआयएस) अहवालात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com