इस्लामाबाद - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पाकिस्तानच्या ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचा ताफा अद्ययावत करण्यासाठी ६८.६ कोटी डॉलर (अंदाजे ६१७४ कोटी रुपये) पॅकेजला मंजुरी दिली आहे..अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीने (डीएससीए) काँग्रेसला सोमवारी पाठवलेल्या पत्राद्वारे ही मंजुरी दिल्याचे वृत्त पाकिस्तानातील ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले आहे. ‘एफ-१६’ प्रणाली, सुरक्षित दळणवळण साधने, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन सॉफ्टवेअर या क्षेत्रातील मदतही अमेरिका पाकिस्तानला देणार आहे..याबाबत औपचारिक सूचना दिल्यानंतर आता ३० दिवसांच्या पुनरावलोकन कालावधीची सुरुवात झाली आहे. अमेरिकी खासदार या प्रस्तावाची तपासणी करणार आहेत. ‘अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या उद्दिष्टांना ही विक्री पूरक ठरेल’ असे अमेरिकेच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी को ऑपरेशन एजन्सी’ने म्हटले आहे..प्रस्तावित विक्रीचा उद्देश पाकिस्तानच्या ‘एफ-१६’ ताफ्याचे आधुनिकीकरण करणे हा आहे. या सुधारणा पाकिस्तान आणि अमेरिकेचे हवाई दल यांच्यातील कारवाया, सराव आणि प्रशिक्षणामधील परस्परसंवाद अधिक सुलभ करतील; तसेच ही दुरुस्ती विमानांचे आयुष्य २०४० पर्यंत वाढवेल आणि महत्त्वाच्या उड्डाणसुरक्षा समस्यांवर उपाय करेल, असे पत्रात नमूद केले आहे..पत्रात पाकिस्तानच्या संरक्षण दलांची तांत्रिक क्षमताही अधोरेखित केली आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास पाकिस्तान सज्ज आहे; तसेच आपल्या सैन्यदलांचे आधुनिकीकरण करण्याबाबत त्या देशाने सातत्यपूर्ण बांधिलकी दाखवली आहे.त्यामुळे ही साधने आणि सेवा आत्मसात करण्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यात म्हटले आहे. या उपकरणांची व तंत्रज्ञानाची विक्री प्रदेशातील मूलभूत लष्करी समतोल बिघडवणार नाही याची काळजी घ्यावी, अशी तंबीही अमेरिकेने दिली आहे..असे असेल साह्य६८.६ कोटी डॉलर - तंत्रज्ञानविषयक विक्रीचे मूल्य३.७ कोटी डॉलर - लष्करी उपकरणांसाठी मदतसन २०४० पर्यंत - विमानांचे आयुष्य वाढणार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.