हल्ल्यापूर्वी माथेफिरूचं एका मुलीशी चॅटिंग; म्हणाला, "माझ्याकडं एक..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

us texas shooter posted gun photos and told a woman he had a secret before shooting

हल्ल्यापूर्वी माथेफिरूचं एका मुलीशी चॅटिंग; म्हणाला, "माझ्याकडं एक..."

अमेरिकेत अल्पवयीन बंदूकधाऱ्यांकडून लोकांवर होणारे हल्ले सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपुर्वी न्यूयॉर्कमधील बफेलोमध्ये एका 18 वर्षीय मुलाने लोकांवर गोळीबार केला होता, ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे आठवणी ताज्या असतानाच आणखी एका घटनेने त्यांना हादरवून सोडले आहे. मंगळवारी टेक्सासमधील एका 18 वर्षीय माथेफिरू मुलाने प्राथमिक शाळेत घुसून केलेल्या गोळीबार केला आहे. (Texas Shooting)

शाळकरी मुलांवर झालेल्या या गोळीबारात हल्ल्यात शाळेतील 19 लहान मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबाराच्या आधी आरोपीने इंस्टाग्रामवर एका मुलीशा चॅटिंग केल्याचे समोर आले आहे.

18 वर्षीय साल्वाडोर रामोसने अमेरिकेतील टेक्सास येथील लहान मुलांच्या शाळेत गोळीबार करण्याच्या काही तास आधी इंस्टाग्रामवरून एका मुलीला कथितपणे मेसेज केला होता, तो म्हणाला की - "माझ्याकडे छोटं गुपित आहे, जे मी तुम्हाला सांगू इच्छितो." त्याने तोंड झाकलेला स्मायलीचा इमोजीही पाठवला. त्याने सकाळी 9.16 वाजता हा मेसेज पाठवला आणि त्यांनंतर सकाळी 11.32 वाजता त्याने उवाल्दे येथील रॉब इलेमेंट्री शाळेत लहान मुलांवर बेछूट गोळीबार केला.

हेही वाचा: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वीचं बौद्ध विहार; डॉ. आगलावेंचा दावा

या गोळीबारानंतर रामोसला गोळ्या घालण्यापूर्वी त्याने 19 मुलांसह 21 जणांची हत्या केली होती. रामोसने मुलीला @salv8dor_ खात्यावरून मेसेज केला. त्यानंतर त्याने मुलीला बंदुकीसह काढलेल्या फोटोमध्ये देखील टॅग केले. त्यानंतर मंगळवारी सकाळी शूटिंगच्या आधी त्याने मुलीला पुन्हा मेसेज केला की, “मी हे करणार आहे”. मुलीने विचारले - तू काय करणार आहेस? त्याने उत्तर दिले: मी तुम्हाला 11 वाजण्यापूर्वी सांगेन.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामोसने शाळेत जाण्यापूर्वी एका वृध्द महिलेवर गोळीबार केला. वेंडी आउटलेटमध्ये नोकरी करण्याआधी तो उवाल्दे हायस्कूलमध्ये शिकत होता. मिडीया रिपोर्टनुसार, त्याने वापरलेली बंदुक देखील त्याने 18 वर्षांचा झाल्यानंतर कायदेशीररित्या खरेदी केली होती.

हेही वाचा: माजी विद्यार्थ्याचा शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार; २१ जणांचा मृत्यू

त्याच्या 18व्या वाढदिवसाला त्याने खरेदी केलेल्या बंदुकीचे अनेक फोटो त्याच्या सोशल मीडियावर आहेत. राज्याचे सिनेटर रोनाल्ड गुटेरेझ यांनी ही माहिती दिली. सप्टेंबरमध्ये संमत झालेल्या नवीन टेक्सास कायद्यानुसार, ज्याच्याकडे प्रोटेक्टिव ऑर्डर असेल तर 18-21 वर्षांच्या वयोगटातील व्यक्तींना कौटुंबिक हिंसाचार, पाठलाग झाल्यास, वेश्याव्यवसाय किंवा लैंगिक तस्करीचा धोका असल्यास बंदुक खरेदी करता येते.

हेही वाचा: 'नरका'च्या दरवाज्याचा आकार वाढतोय; काय आहे कारण? जाणून घ्या..

Web Title: Us Texas Shooter Posted Gun Photos And Told A Woman He Had A Secret Before Shooting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :americaUS Shooting
go to top