
अमेरिकेत गोळीबाराच्या छोट्या-मोठ्या घटनांकडं नेहमीच मोठी समस्या म्हणून पाहिलं जातं.
USA Chicago : शिकागोत झालेल्या गोळीबारात 8 ठार, तर 16 जण जखमी
शिकागो : अमेरिकेतील शिकागोमध्ये (USA Chicago) आठवड्याच्या शेवटी झालेल्या गोळीबाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 8 जण ठार झालेत, तर 16 जण जखमी झाले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आलीय.
शहर पोलिसांच्या हवाल्यानं स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गोळीबाराची घटना शुक्रवारी सायंकाळी 5:45 च्या सुमारास घडली. NBC शिकागो दक्षिण किलपॅट्रिक इथं 69 वर्षीय व्यक्तीची त्याच्याच घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर, पीडितांमध्ये अल्पवयीन आणि 62 वर्षीय महिलेसह सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. ब्राइटन पार्क, साउथ इंडियाना, नॉर्थ केडजी अव्हेन्यू, हम्बोल्ट पार्क यासह अनेक भागात या घटना घडल्याचं अहवालात म्हटलंय.
हेही वाचा: 'मुस्लिमांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पेयांमध्ये असतात ड्रग्ज'
एका माध्यमाच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटी शहरात झालेल्या गोळीबाराच्या या सर्व घटनांमध्ये एकूण आठ जणांचा मृत्यू झालाय. या हत्यांशिवाय सुमारे 42 जण जखमीही झाले आहेत. अमेरिकेत अशा गोळीबाराच्या छोट्या-मोठ्या घटनांकडं नेहमीच मोठी समस्या म्हणून पाहिलं जातं. 2022 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये 140 हून अधिक सामूहिक गोळीबाराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत, असं एका रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.
Web Title: Usa Chicago Shootings 8 Dead 16 Injured In Us Gun Violence Incident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..