
'हिंदू आणि ख्रिश्चन महिलांनी किमान चार मुलं जन्माला घालणं आवश्यक आहे.'
'मुस्लिमांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पेयांमध्ये असतात ड्रग्ज'
राज्यातील मुस्लिमांच्या रेस्टॉरंटमध्ये (Muslim Restaurant) मिळणाऱ्या पेयांमध्ये ड्रग्ज (Drugs) असतात. त्यामुळं मुस्लिमांच्या व्यवसायावर बहिष्कार टाका, असं थेट आवाहन केरळचे माजी काँग्रेस नेते पीसी जॉर्ज (Congress leader PC George) यांनी केलंय. मात्र, जॉर्ज यांच्या या विधानांमुळं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जॉर्ज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी राजकारण्यांनी पोलिसांकडं केलीय.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शुक्रवारी हिंदू महासंमेलनात (Hindu Mahasammelan) जॉर्ज म्हणाले, मुस्लिम व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाणं टाळा. कारण, हे लोक पेयांमध्ये ड्रग्जचा एक थेंब टाकतात, ज्यामुळं आपल्याला नपुंसकता येऊ शकते. महिला आणि पुरुषांची नसबंदी करून मुस्लिमांना देश ताब्यात घ्यायचा आहे, त्यामुळं ते असा प्रकार रेस्टॉरंटमध्ये करत आहेत. यावेळी जॉर्ज यांनी मुस्लिम जेवणात तीन वेळा थुंकल्याच्या जुन्या आरोपाचाही पुनरुच्चार केलाय.
हेही वाचा: "मुस्लिमांचा अल्लाह बहिरा आहे, त्यामुळं..."; साध्वींचं वादग्रस्त विधान
जॉर्ज पुढं म्हणाले, मुस्लिम इतर समाजाकडून पैसे मिळवण्यासाठी बिगर मुस्लिम भागात व्यवसाय सुरू करत आहेत. अशा व्यापारावर बहिष्कार टाकला पाहिजे. हिंदू आणि ख्रिश्चन महिला अधिक मुलं जन्माला घालण्यास नाखूष दिसत आहेत. मात्र, मुस्लिम महिला हे काम अतिशय गांभीर्यानं करतात. हे हिंदू राष्ट्र काबीज करण्याच्या ध्येयाकडं त्यांची वाटचाल सुरूय. हिंदू आणि ख्रिश्चन स्त्रियांनी किमान चार मुलं जन्माला घालणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा: 'आम्ही कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करत नाही, या सर्व फालतू गोष्टी'
जॉर्ज यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राजकीय नेत्यांमध्ये विरोध सुरू झालाय. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नेते पीके फिरोज यांनी पोलिसांत तक्रार केली असून त्यांनी जॉर्जविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. काँग्रेस नेते शफी परंबिल आणि व्हीटी बलराम यांनीही जॉर्ज यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय.
Web Title: Former Congress Leader Pc George Controversial Statement About A Muslim Restaurant
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..