esakal | अमेरिकेत कोरोनाचे 5 लाख बळी, राष्ट्रध्वज अर्ध्यावर; 102 वर्षानंतर अशी परिस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

us flag

अमेरिकेत कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू झाले असून सोमवारी मृतांचा आकडा 5 लाखांवर पोहोचला. या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेच्यावतीने राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमेरिकेत कोरोनाचे 5 लाख बळी, राष्ट्रध्वज अर्ध्यावर; 102 वर्षानंतर अशी परिस्थिती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन - गेल्या वर्षभरापासून जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. यामध्ये सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून त्यानंतर भारत, ब्राझील, इंग्लंड या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. अमेरिकेत कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू झाले असून सोमवारी मृतांचा आकडा 5 लाखांवर पोहोचला. या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेच्यावतीने राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हाइट हाउसने सोमवारी याबाबती माहिती दिली होती. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन याबाबतची औपचारिक घोषणा केली. अमेरिकन सरकारच्या सर्व संघराज्यांच्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज पाच दिवसांसाठी अर्ध्यावर घेण्यात येईल. व्हाइट हाउसचे प्रेस सचिव जेन पास्की यांनी सांगितलं की, पाच दिवस हा आदेश असणार आहे. 

राष्ट्राध्यक्ष बायडेन सोमवारी एका शोकसभेत सहभागी झाले होते. यामध्ये त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 5 लाख नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आणि भावना व्यक्त केल्या. ब्रिटन, अमेरिकेसह इतर अनेक देशात कोरोनावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. काही देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण कमी झाले असली तरी त्याचा धोका कमी झालेला नाही. 

कोरोनाशी संबंधित आकडेवारीची माहिती ठेवणाऱ्या एजन्सच्या माहितीनुसार, अमेरिकेत मृतांचा आकडा 5 लाखांच्या वर पोहोचली आहे. मात्र अमेरिकन सरकारने दिलेली आकडेवारी यापेक्षा थोडी कमी आहे. बायडेन श्रद्धांजली वाहण्यासाठी आय़ोजित कार्यक्रमात सहभागी होण्याआधी देशाला संबोधित केली. यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मौनही पाळण्यात आलं. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला फारसं गांभीर्याने घेतलं नव्हतं. अनेक कार्यक्रमात त्यांनी मास्कची खिल्लीही उडवली होती. बायडेन यांनी मात्र कोरोना विरोधात लढ्याला प्राधान्य दिलं आहे. तसंच वेगानं लसीकरण मोहिमेवर भर दिला असून कोरोनाविरोधात जनजागृती सुरु केली आहे. 

देशाचे वरिष्ठ व्हायरॉलॉजिस्ट डॉक्टर अँथनी फाउची यांनी सांगितलं की, 1918 मध्ये आलेल्या इन्फ्लूएन्झा साथीनंतर गेल्या 102 वर्षात असं कधीच झालेलं नाही. अमेरिकेत 19 जानेवारीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख इतकी झाली होती.