esakal | अमेरिकेतील रुग्णांची संख्या लाखावर; जाणून घ्या आज जगात कोठे काय घडले!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-USA

ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड, जर्मनी या देशांतही कमी-अधिक प्रमाणात चिंताजनक परिस्थिती आहे.

अमेरिकेतील रुग्णांची संख्या लाखावर; जाणून घ्या आज जगात कोठे काय घडले!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रोम/माद्रीद : कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मानवी नुकसान सोसत असलेल्या इटली आणि स्पेन या देशांमध्ये गेल्या चोवीस तासांत विक्रमी संख्येने नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती आणखीनच चिंताजनक बनली आहे. इटलीमध्ये एकाच दिवसांत ९६९, तर स्पेनमध्ये ७६९ जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. जागतिक पातळीवरही मृतांच्या संख्येने २७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरातच कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने आणखी काय उपाययोजना कराव्यात, या चिंतेत सर्व नेते पडले आहेत. युरोपमध्ये सध्या या विषाणूने थैमान घातले असून या खंडातच संसर्गग्रस्तांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे.

इटलीमध्येही मृतांची संख्या दहा हजारांच्यावर कोणत्याही क्षणी पोहोचेल अशी चिन्हे असताना, अद्याप सर्वांत गंभीर परिस्थिती येणे बाकी आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने इटली सरकारच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रोज नव्याने समोर येणाऱ्या बाधितांच्या संख्येत होत असलेली घट, हीच त्यांच्यासाठी एकमेव दिलासादायक बाब आहे. स्पेनमध्येही इटलीसारखीच परिस्थिती आहे.

- Fight with Corona : इटलीनं खरंच 'सरेंडर' केलं आहे काय?

दुसरीकडे, या दोघांचे उदाहरण समोर असून अद्यापही पूर्ण देश लॉकडाउन न केलेल्या अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांच्या वर, तर मृतांची संख्या १७०० च्या वर गेली आहे. ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड, जर्मनी या देशांतही कमी-अधिक प्रमाणात चिंताजनक परिस्थिती आहे. युरोपमध्ये असे वातावरण असताना आज दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाने पहिला बळी घेतला. त्यामुळे येथे लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. 

- सलाम तुमच्या कार्याला; संकटात मदत करावी टाटा समूहासारखी!

जगात कोठे काय घडले? 

बीजिंग : चीनमध्ये ५४ नवे रुग्ण; मृतांची संख्या तीनने वाढून ३,२९५ वर. 
वॉशिंग्टन : मित्रदेशांना व्हेंटिलेंटर्सचा पुरवठा करण्यास अमेरिका तयार 
पनामा : अनेक दिवसांपासून समुद्रात नांगर टाकून उभ्या असलेल्या जहाजावरील चार जणांचा मृत्यू; कोरोनाच्या संसर्गाची शंका 
पॅरिस : गेल्या चोवीस तासांत फ्रान्समध्ये तीनशे जणांचा मृत्यू. 

- अभिमानास्पद ! बाळाला जन्म देण्याआधी 'या' मराठी महिलेने दिला कोरोना टेस्टिंग किटला जन्म

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोनाचे ११ बळी, रुग्णांची संख्या १३०० च्या वर. 
कोलंबो : संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी श्रीलंकेत साडे चार हजार जणांना अटक. 
वॉशिंग्टन : पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा विचार. 
वुहान : कोरोनाचे सुरुवातीचे केंद्र असलेल्या चीनमधील हुबेई प्रांतातील विमानसेवा रविवारपासून (ता. २९) सुरु करण्याचा चीन सरकारचा निर्णय.