esakal | अंतराळात घडला पहिला गुन्हा; नासा करणार चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

Nasa

अंतराळ आणि पृथ्वीच्या कक्षेबाहेरील वातावरण, तिथल्या रहस्याबद्दल अनेकांना कुतुहल असते. पण, आता अंतराळात घडलेल्या पहिल्या गुन्ह्याची चौकशी नासा करणार आहे. आरोप असा आहे, की एका महिला अंतराळवीराने अंतराळ स्थानकातून घटस्फोटीत नवऱ्याचे बँक अकाउंट हॅक केले. 

अंतराळात घडला पहिला गुन्हा; नासा करणार चौकशी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : पृथ्वीच्या परिघाबाहेर अंतराळात पहिला गुन्हा घडल्याची घटना घडली असून, नासा या प्रकरणाची चौकशी करणार आहे. 

अंतराळ आणि पृथ्वीच्या कक्षेबाहेरील वातावरण, तिथल्या रहस्याबद्दल अनेकांना कुतुहल असते. पण, आता अंतराळात घडलेल्या पहिल्या गुन्ह्याची चौकशी नासा करणार आहे. आरोप असा आहे, की एका महिला अंतराळवीराने अंतराळ स्थानकातून घटस्फोटीत नवऱ्याचे बँक अकाउंट हॅक केले. 

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अॅनी मॅकक्लेवर तिचा घटस्फोटीत पती समर वॉर्डन यांचे बँक खाते नासाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असताना हॅक केल्याचा आरोप आहे. वॉर्डनने मॅकक्लेनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मॅकक्लेनने पतीचे खाते चेक केल्याची कबुली दिली आहे. मात्र, तिने काहीही गैरव्यवहार केला नसल्याचे म्हटले आहे. नासाकडे या बाबत तक्रार करण्यात आली असून, याची चौकशी होणार आहे. दोषी आढळल्यास पृथ्वीवरील कायद्यानुसार शिक्षा होणार आहे.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक आहे की नाही, एवढेच बघत होते. वॉर्डनकडे मुलाचा सांभाळ करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत की नाही हे बघत होते, असे मॅकक्लेनच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. वॉर्डन आणि मॅकक्लेन यांचे लग्न 2014 मध्ये झाले होते. वॉर्डन एअर फोर्समध्ये गुप्तचर विभागात काम करतो. चारच वर्षांत दोघात वाद सुरु झाले आणि 2018 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोघांशी संपर्क साधला जात आहे. जर आरोप सिद्ध झाला तर अंतराळात करण्यात आलेला हा पहिला गुन्हा ठरणार आहे, असे नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

loading image
go to top