पाकिस्तान, चीनला अमेरिकेचा इशारा; दहशतवादाला पाठिंबा देऊ नका 

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

तणाव कमी करण्याचे दोन्ही देशांना आवाहन 
"पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तत्काळ पावले उचलावी,' असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांनी केले आहे. सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी काल पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की या घटनेत दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम बाळगावा आणि तणाव कमी करण्यासाठी त्वरित उपाय करण्याचे आवाहन गुटारेस यांनी केले आहे. जर, दोन्ही देशांना मान्य असेल, तर ते मध्यस्ती करण्यास कायम तयार आहेत.

वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना आसरा न देणे व दहशतवादाला पाठिंबा देण्याविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने केलेल्या ठरावाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी लक्षात घेत पाकिस्तान व चीनने दहशतवादाला थारा देऊ नये, असा इशारा अमेरिकेने बुधवारी दिला. 

"जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे गेल्या गुरुवारी (ता. 14) "सीआरपीएफ'च्या जवानांवर "जैशे मंहमद'ने केलेला दहशतवादी हल्ला भयानक होता,'' असे वर्णन करीत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला संपूर्ण सहकार्य देण्याचे निर्देश ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनाला दिले आहेत. तसेच, या महाघातकी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्याची तंबी त्यांनी पाकिस्तानला दिली. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात "सीआरएफ'चे 40 जवान हुतात्मा झाले. तेव्हापासून भारत व चीनमध्ये तणाव आहे. व्हाईट हाऊसमधील कार्यालयात पत्रकारंशी बोलतना ट्रम्प म्हणाले, "" दक्षिण आशियातील या दोन शेजाऱ्यांचे संबंध चांगले असते, तर ती गोष्ट अद्‌भूत होती. मी निरीक्षण करीत आहे. मला याबाबत अहवाल मिळत असून, योग्य वेळ येताच मी त्यावर बोलेन.'' 

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. ""या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यासाठीच नाही, तर आमचा पूर्ण पाठिंबा देण्याबाबत भारताशी आमचे बोलणे झाले आहे. दहशतवादाशी सर्व प्रकारे लढा देण्यासाठी भारताबरोबर काम करण्यास आम्ही बांधिल आहेत,'' अशी ग्वाही परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी या वेळी दिली. भारताबरोबर अमेरिकेचे निकटचे व सहकार्याचे, सुरक्षेचे संबंध आहेत. यात दहशतवादविरोधातील मोहिमांचाही समावेश आहे, असेही ते म्हणाले. 

तणाव कमी करण्याचे दोन्ही देशांना आवाहन 
"पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तत्काळ पावले उचलावी,' असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांनी केले आहे. सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी काल पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की या घटनेत दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम बाळगावा आणि तणाव कमी करण्यासाठी त्वरित उपाय करण्याचे आवाहन गुटारेस यांनी केले आहे. जर, दोन्ही देशांना मान्य असेल, तर ते मध्यस्ती करण्यास कायम तयार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: USA president Donalad Trump warned China Pakistan on Pulwama terror attack