डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत 

वृत्तसंस्था
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

"फास्ट फूड'प्रेमी ट्रम्प 
ट्रम्प (वय 72) हे निर्व्यसनी आहेत. त्यांना बैठी जीवनशैली आवडते. मात्र व्हाइट हाउसच्या इमारतीत आपले खूप चालणे होते, असा ट्रम्प यांचा दावा आहे. ते "फास्ट फूड'प्रेमी असून गेल्या महिन्यात त्यांनी "क्‍लेमसन टायगर्स' या महाविद्यालयीन फुटबॉल विजेत्या संघाला व्हाइट हाउसमध्ये निमंत्रण दिले होते, तेव्हा त्यांनी बर्गर, फ्रेंच फ्राइज व पिझ्झा यांची मेजवानी दिली होती. 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आरोग्य उत्तम असून, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आणि त्यानंरही त्यांचा प्रकृती निकोप राहिल, असा दिलासा ट्रम्प यांच्या डॉक्‍टरांनी दिला. 

ट्रम्प यांची वार्षिक आरोग्य तपासणी शुक्रवारी (ता. 8) झाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे 2017 मध्ये स्वीकारल्यापासूनची ही त्यांची दुसरी आरोग्य तपासणी होती. चार तास चाललेल्या या तपासणीनंतर ट्रम्प यांचे वैद्यकीय सल्लागार व नौदल अधिकारी सिन पी. कॉनले म्हणाले, की तपासणीचा अहवाल व डॉक्‍टरांच्या शिफारशी अद्याप आलेल्या नसल्या तरी अमेरिकेच्या अध्यक्षांची प्रकृती उत्तम असून, ती भविष्यातही चांगलीच राहणार आहे. कॉनले हे व्हाइट हाउसच्या वैद्यकीय विभागाचे संचालक आहेत. 

"फास्ट फूड'प्रेमी ट्रम्प 
ट्रम्प (वय 72) हे निर्व्यसनी आहेत. त्यांना बैठी जीवनशैली आवडते. मात्र व्हाइट हाउसच्या इमारतीत आपले खूप चालणे होते, असा ट्रम्प यांचा दावा आहे. ते "फास्ट फूड'प्रेमी असून गेल्या महिन्यात त्यांनी "क्‍लेमसन टायगर्स' या महाविद्यालयीन फुटबॉल विजेत्या संघाला व्हाइट हाउसमध्ये निमंत्रण दिले होते, तेव्हा त्यांनी बर्गर, फ्रेंच फ्राइज व पिझ्झा यांची मेजवानी दिली होती.

Web Title: USA president Donald Trump health is very good