पॉर्न साईट्स चोरून बघताय तर तुमची माहिती...

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

इनकॉग्निटो मोड हा सुरक्षित ब्राऊझिंगसाठी ओळखला जातो. या मोडमध्ये माहिती सेव्ह राहात नसली तरी थर्ड पार्टी कंपन्या आपल्या हालचालींवर नजर ठेवतात आणि आपली माहिती पॉर्न कंपन्यांना विकतात, असे समोर आले आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पॉर्न बघत असाल तर सावधान! इतरांनाही सावध करा. तुमचा डेटा इतरत्र विकला जात आहे.

नवी दिल्ली : सध्या पॉर्न साईट पाहण्यासाठी कोणाला समजू नये म्हणून लॅपटॉप किंवा मोबाईलवर इनकॉग्निटो मोडचा वापर करतो. पण, सावधान तेथूनही तुमच्या डेटावर नजर ठेवण्यात येत आहे. 

गुगल, फेसबुकसह ओरॅकल क्लाईड अशा लोकांवर नजर ठेऊन असतात, अशी धक्कादायक माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट, कानेर्गी मेलन विद्यापीठ आणि पेन्सेल्वेनिया विद्यापीठ यांनी यासंदर्भात अभ्यास केला आहे. वेबएक्सरे नावाच्या उपकरणाच्या आधारे जवळपास 22 हजार 484 पॉर्न साईट्स स्कॅन करण्यात आल्या. त्यानुसार जवळपास 93 टक्के वेब पेजेस युझर्सचा खासगी डाटा थर्ड पार्टीला विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

इनकॉग्निटो मोड हा सुरक्षित ब्राऊझिंगसाठी ओळखला जातो. या मोडमध्ये माहिती सेव्ह राहात नसली तरी थर्ड पार्टी कंपन्या आपल्या हालचालींवर नजर ठेवतात आणि आपली माहिती पॉर्न कंपन्यांना विकतात, असे समोर आले आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पॉर्न बघत असाल तर सावधान! इतरांनाही सावध करा. तुमचा डेटा इतरत्र विकला जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: users are being watched as they navigate around pornography sites experts warn