गुगलला आता आपण सर्च रिजल्टवरुन वैयक्तिक माहिती काढून टाकण्यास सांगू शकतो

इंटरनेटचा वापर करताना सर्च इंजिन गुगल हे आपल्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे.
Google
Googlesakal

प्राइवेसी हा आजच्या इंटरनेटच्या युगात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकजण इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेटचा वापर करताना सर्च इंजिन गुगल हे आपल्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. कधीकधी तुमची अत्यंत वैयक्तिक माहिती देखील काही मिनिटांत ती हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत सर्च इंजिन गुगलने आपल्या युजर्ससाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत, युजर्स आता स्वतःबद्दलची कोणतीही वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती गुगलला काढून टाकण्यास सांगू शकतात. (Users can request to google to remove personal information from google search results)

Google
आता कोकाकोला खरेदी करणार!

Google च्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे याआधी असे अनेक धोरणे आहेत जी लोकांना वैयक्तिक अशी माहिती काढून टाकण्याची विनंती करतात जी थेट लोकांना थेट हानी पोहोचवू शकते. कधीकधी आपली वैयक्तिक माहिती इतरत्र आणि अनपेक्षित ठिकाणी जाते, जे चुकीचे आहे. त्यामुळे आपली सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विकास होणे गरजेचे आहे

Google
हेच ऐकायचे होते बाकी! अॅपलनं आणली पाण्याची बाटली

युजर्स Google ला विविध माहिती काढून टाकण्यास सांगू शकतील

गुगलने अपडेट्सची माहिती दिली आहे. यामध्ये ईमेल अॅड्रेस, घर किंवा कार्यालयाचे अॅड्रेस,, फोन नंबर आणि इतर वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती समाविष्ट आहे जी हटविली जाऊ शकते. याव्यतिरिक्त तुम्ही सर्चमधून तुमची लॉगिन क्रेडेंशियल काढण्याची विनंती करू शकता.हे युजर्सला हॅकिंगपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.

Google
राज्यात आता PUC चाचणी करणं महागलं; जाणून घ्या नवे दर

तुमची माहिती Google वरून काढून टाकण्यासाठी, तुम्ही Google च्या 'हेल्प पेज' ' वर भेट देऊन कोणतीही वैयक्तिक माहिती काढून टाकण्याची विनंती करू शकता. येथे तुम्हाला तुमची माहिती कुठे उपलब्ध आहे, यासाठी URL विचारले जाईल. त्यानंतर यासंदर्भात कारवाई करताना गुगल URL काढून टाकणार. त्यामुळे यापुढे सर्चमध्ये तुमची वैयक्तिक माहिती दिसणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com