मित्राचे तुकडे करुन थांबला नाही, रक्तही प्यायले!

वृत्तसंस्था
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

मॉस्को : एका रशियन व्यक्तीने आपल्या 16 वर्षीय मित्राची हत्या करुन त्याचे रक्त पिल्याची धक्कादायक घटना मॉस्को येथे घडली. यातील विशेष बाब म्हणजे संबंधित आरोपी हा डॉक्टर असल्याचे खोटं सांगत बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून तो रुग्णालयात सेवा करत होता. 

याबाबत तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की आम्ही याप्रकरणी 36 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. संबंधित आरोपी हा उरल्स शहरातील चेल्याबिंस्क येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. त्याच्याविरोधात बनावट पदवी प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्यामुळे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आरोप करण्यात आले आहेत. या व्यक्तीचे नाव बोरिस कोंड्राशिन असे असून, त्याने हा गंभीर प्रकारचा गुन्हा केल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

या आरोपीने आपल्या 16 वर्षीय मित्राला इंजेक्शन दिले होते. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करत हत्या केली. या हत्येनंतर त्याने आपल्या मित्राचे रक्त पिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vampire killer who cut up friends body drank blood found faking as doctor

टॅग्स