भारतीय जवानाबाबत पाक अभिनेत्री म्हणते, अच्छी मेहमान नवाजी होगी!

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद - एकिकडे पाकिस्तान भारताला शांततेसाठी विनवण्या करत आहे. तर दुसरिकडे पाक अभिनेत्री वीणा मलिक हीने ट्विटरवर मुक्ताफळं उधळली आहेत. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या बाबत ट्विट करताना तिने ''अभी अभी तो आए हो, अच्छी मेहमान नवाजी होगी''! असे म्हटले आहे.

अभिनंदन यांना कोणतीही इजा होता कामा नये, अशा  शब्दांत केंद्राने इस्लामाबादला खडसावले आहे. तसेच त्यांना परत आणण्यासाठीही भारताचे प्रयत्न सुरु आहेत. तर पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जात आहे. तर वीण मलिक गेल्या काही दिवसांपासून भारता विरुद्ध ट्विट करत आहे. त्यामुळे पाकिस्तानचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. 

तिच्या या मुक्ताफळांना स्वरा भास्कने चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'वीणाजी शेम ऑन यू' असे म्हणत...आमचे ऑफिसर हिरो आहेत. तुमच्या ताब्यात असले तरी तुम्ही त्यांना सन्मानाची वागणून दिली पाहिजे. थोडी तरी तमा बाळगा..असे स्वरा भास्करने वीणाला खडसावले आहे.

वीणा मलिक बीग बॉस सिझन 4 मध्ये होती. भारतात काम करुन देखील तिने अशा मुक्ताफळं उधळली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veena Malik Mocks IAF Pilot in Pakistan Custody, Swara Bhasker Gives a Befitting Reply