व्हेनिस शहरात पूर; सर्वत्र पाणीच पाणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

- इटलीच्या व्हेनिस शहराला बसला पुराचा मोठा तडाखा.

व्हेनिस : इटलीच्या व्हेनिस शहराला पुराचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. याशिवाय ऐतिहासिक ठिकाणांना पुराने वेढले आहे. 53 वर्षांतील सर्वांत भीषण असा पूर येथे आला आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शहरातील सेंट मार्क्स स्क्वेअरला पाण्यात वाट काढावी लागत आहे. या मोठ्या पुरामुळे या भागात जवळपास पाच ते सहा फूटांच्या लाटा उसळत आहेत. रशियात बर्फवृष्टीमुळे थंडी वाढत आहे. तसेच भारत-बांगलादेशात गेल्या आठवड्यात वादळाने थैमान घातले. त्यानंतर आता भीषण पूर आला आहे.

नव्या आघाडीसाठी जोरबैठका

दरम्यान, मागील वर्षी खराब हवामानामुळे 11 जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आता येथे पूर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Venice floods Italy to declare state of emergency over damage