G7 शिखर परिषद : PM मोदींना भेटण्यासाठी बायडन यांनी केली घाई; व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video of US President to meet PM Modi goes viral

G7 परिषद : PM मोदींना भेटण्यासाठी बायडन यांनी केली घाई; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (joe biden) अचानक येतात आणि मागून पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या खांद्यावर हात ठेवतात. पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी हस्तांदोलन करीत आहेत. तेव्हा अचानक जो बायडन मागून येतात आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मोदींना काहीतरी म्हणतात. मोदी देखील मागे वळून पाहतात आणि नंतर दोन्ही नेते हसतात. एकमेकांशी प्रेमाने हस्तांदोलन करतात, असे व्हिडिओत दिसत आहे. (Video of US President to meet PM Modi goes viral)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी सोमवारी (ता. २७) G-७ शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (joe biden), फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची भेट घेतली. ग्रुप फोटो काढण्यापूर्वी या नेत्यांमध्ये संभाषण झाले होते. यावेळी सर्व नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी कॅनडाच्या पंतप्रधानांशी संवाद साधताना दिसले. ग्रुप फोटोनंतर मोदी आणि मॅक्रॉन यांनी मिठी मारली आणि संवाद साधला.

हेही वाचा: महिला म्हणताहेत, गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच संबंध बनवणार

रात्री दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे. G-७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रविवारपासून दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी त्यांचे दक्षिण जर्मनीतील शिखर परिषदेत स्वागत केले. शिखर परिषदेच्या ठिकाणी आत गेल्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा सुरू ठेवली आणि एकत्र आत गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भेट घेतली, असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर म्हटले आहे. ‘G-७ जागतिक स्तरावर नेत्यांसोबत समिट’, असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा: राबडी देवींनी PM मोदींबाबत व्यक्त केला ‘हा’ विश्वास; म्हणाल्या...

मे महिन्यात जपानमधील क्वाड समिटमध्ये भेटल्यानंतर मोदी (narendra modi) आणि बायडन यांच्यात ही पहिलीच भेट होती. जर्मन प्रेसीडेंसीने अर्जेंटिना, भारत, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिकेला बव्हेरियातील इल्लामाऊ येथे होणाऱ्या G-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे.

Web Title: Video Of Us President To Meet Pm Modi Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top