Video: मोटारीमधून झाड रात्रीत बाहेर आलंच कसं?

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

एका मोटारीमधून झाड बाहेर आल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दैवी चमत्कार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या. प्रत्येकजण यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता.

पॅरीसः एका मोटारीमधून झाड बाहेर आल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दैवी चमत्कार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या. प्रत्येकजण यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता.

फ्रान्समध्ये एका रात्रीत उगवलेले हे झाडं सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. व्हिडिओमध्ये एका गाडीच्या छतामधून झाड बाहेर आल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. मोटारीच्या बाजूला नागरिक असून, ते आश्चर्याने झाड व मोटार पाहाताना दिसत आहेत. गाडीचे छत फाडून त्यामधून झाड वर येणे हा एक दैवी चमत्कार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

मात्र, या व्हिडिओमागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे मोटारीच्या कंपनीनेच केल्याचे समजले. मोटारीमधील झाडामुळे कंपनी चर्चेत आली असून, मोठी जाहिरात झाली आहे. गाडीच्या छतामधून वर आलेले हे झाड म्हणजे एक कलाकृती आहे. रॉयल डिलक्स या थेअटर कंपनीने 8 नोव्हेंबर रोजी नट्स येथील बेलेवूमधील एका चौकात ही कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीमध्ये गाडीचे छप्पर फाडून झाड वर आलेले दिसत आहे. दैवी चमत्कार नसल्याचेही म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: video viral of tree growing out of car is an art installation