उदरनिर्वाहासाठी माल्ल्या बायकोच्या कमाईवर अवलंबून

vijay_mallya_
vijay_mallya_

लंडन - मद्यसम्राट विजय मल्ल्याची बँक खाती गोठवण्यास सुरुवात झाल्यावर त्याचे धाबे दणाणले आहे. संपत्ती गोठवण्यावर स्थगिती द्यावी यासाठी माल्ल्याचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी त्याने आपल्यावर आर्थिक दृष्ट्या पत्नीवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याचे रडगाणे गायले आहे. ''पत्नीच्या पैशावर माझा उदरनिर्वाह चालतो. पर्सनल असिस्टंट, ओळखीचे उद्योजक आणि मुलांकडून मला उधारी घ्यावी लागते''. असे त्याने म्हटले आहे. तर बँक खाती गोठवली जाऊ नयेत, अशी विनवणी मल्ल्याने केली आहे. 

विजय माल्ल्याने 13 बँकांचे 11 हजार कोटी रुपये थकविले आहेत, या बँकांनी गेल्यावर्षी 11 सप्टेंबर रोजी त्याच्या विरोधात न्यायलयात दिवाळखोरी याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या डिसेंबरमध्ये सुनावणी होणार आहे. बँकांच्या याच याचिकेवर एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने कोर्टापुढे बँक खाती न गोठवण्याची आणि दिवाळखोर जाहीर न करण्याची विनंती केली आहे. 

माझी व्यक्तिगत संपत्ती 2,956 कोटी रुपये एवढी राहिली आहे. बँकांशी सेटलमेंट करण्यासाठी या संपूर्ण संपत्तीची माहिती कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सादर केली असल्याचे त्याने म्हटले आहे.

विजय मल्ल्याची पार्टनर/पत्नी पिंकी लालवानी वर्षाला 1.35 कोटी रुपये कमवते. त्याची पर्सनल असिस्टंट महल आणि एक ओळखीचा उद्योगपती बेदीकडून त्याने अनुक्रमे 75.7 लाख आणि 1.15 कोटी रुपये उधार घेतले आहेत, अशी माहिती बँकांनी कोर्टाला दिली आहे. तर उदरनिर्वाह चालविण्यासाठी आणि काही कर्ज फेडण्यासाठी हे पैसे उधार घेतले आहेत, असे मल्ल्याने कोर्टाला सांगितले आहे. मल्ल्याने ब्रिटीश सरकारचे करापोटीचे 2.40 कोटी रुपये थकविले आहेत. तसेच माजी वकील मॅकफर्लेंस यांची फी सुद्धा मल्ल्याने थकविल्याचे ऍड. निजेल तोजी यांनी न्यायालयापुढे स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com