
इस्लामाबाद (पीटीआय) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेवरून सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. ‘पीटीआय’चे शेकडो कार्यकर्ते आज इस्लामाबादच्या ‘डी’ चौक येथे धडकले असून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी आणि निमलष्करी दलाच्या सैनिकांनी कारवाई सुरू केली आहे.