esakal | दक्षिण आफ्रिकेत हिंसाचार; लुटालूट आणि चेंगराचेंगरीत 72 जण मृत
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण आफ्रिकेत हिंसाचार; लुटालूट आणि चेंगराचेंगरीत 72 जण मृत

दक्षिण आफ्रिकेत हिंसाचार; लुटालूट आणि चेंगराचेंगरीत 72 जण मृत

sakal_logo
By
विनायक होगाडे

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अटकेनंतर दोन प्रांतांमध्ये अनेक ठिकाणी उफाळलेला हिंसाचार अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. अनेक ठिकाणी लुटालूटीचे प्रकार सुरु असून चेंगराचेगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ झाली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी झुमा यांना १५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून गेल्या आठवड्यात ते पोलिसांना शरण आले आहेत.

हेही वाचा: मोठी संधी! इन्फोसिस करणार 35 हजार फ्रेशर्सची भरती

या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेतील गुतेंग आणि क्वाझुलु-नाताल या दोन प्रांतांमध्ये अराजकता वाढली आहे. हजारो लोक मॉल आणि दुकानांमध्ये लुटालूट करत आहेत. अन्न, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मद्य आणि कपडे यांची मोठ्या प्रमाणवर लूट केली जात आहे. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिस आणि सैनिकांना रबरी गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागत आहे. अशा वेळी मोठा गोंधळ उडून चेंगराचेंगरी होत असून त्यात अनेकांचा मृत्यू होत आहे. वाढत्या अशांततेमुळे या दोन राज्यांमधील अनेक लसीकरण केंद्रेही बंद करावी लागली असून पोलिसांनी आतापर्यंत बाराशे जणांना अटक केली आहे.

हेही वाचा: देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे 'लय भारी'

अनेक नागरिकांनी एटीएम यंत्रे फोडण्याचाही प्रयत्न केला. ही यंत्रे फोडण्यासाठी स्फोटकांचा केलेला वापर काही जणांच्या जीवावर बेतला. पोलिसांच्या गोळीबारातही काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेमधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या गरीबीत जगत असून बेरोजगारीचा दर ३२ टक्के आहे. त्यातच कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने भूकबळी आणि नैराश्‍याचे प्रमाण वाढले आहे. सरकारविरोधातील नाराजी वाढत असतानाच झुमा यांना अटक झाल्याने लोकांना आंदोलन करण्याचे कारण मिळाले आणि लवकरच आंदोलनाचे रुपांतर सामूहिक लुटालूटीत झाले, असे येथील माध्यमांनी म्हटले आहे.

loading image