Russia and Ukraine War : पुतीन यांच्या विरोधात रशियात जोरदार निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Violent protests against Vladimir Putin announced withdrawal of Russia reserve forces

Russia and Ukraine War : पुतीन यांच्या विरोधात रशियात जोरदार निदर्शने

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात व्लादिमीर पुतीन यांनी रशियाचे राखीव सैन्य उतरवण्याची घोषणा केल्यानंतर रशियामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत. पुतीन यांनी २१ सप्टेंबरला रशियाचे चार लाख राखीव सैन्य युद्धात उतरवण्याची घोषणा केल्यानंतर मॉस्को, सेंट पीट्सबर्गसह ३८ शहरांत हजारो नागरिकांनी रस्त्यावर येत ‘नो टू वॉर’ अशा घोषणा देत, पुतीन यांच्या विरोधात निदर्शने केली. काही ठिकाणी पोलिस आणि निदर्शकांत बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

यावेळी निदर्शकांना पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. या निदर्शनादरम्यान पोलिसांनी संपूर्ण देशभरात तेराशेहून अधिक नागरिकांना ताब्यात घेतले असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. तसेच पोलिसांनी निदर्शने करणाऱ्यांना शांततेचे आवाहन करत घरी परत जाण्याच्या सूचना देखील दिल्या. मात्र निदर्शने तीव्र होत गेल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान, पुतीन यांच्याविरुद्धच्या निदर्शनांवेळी पोलिसांनी काही महिलांना फरपटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामुळे पोलिस यंत्रणेवर टीका होत आहे.

Web Title: Violent Protests Against Vladimir Putin Announced Withdrawal Of Russia Reserve Forces

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..