ऐकावं ते नवलंच! चक्क 37 वर्षाच्या पुरुषाने दिला बाळाला जन्म

ट्रान्सजेंडर पुरुषालाही मिळालं मातृत्वाचं सुख
चक्क 37 वर्षाच्या पुरुषाने दिला बाळाला जन्म
चक्क 37 वर्षाच्या पुरुषाने दिला बाळाला जन्मesakal

आपल्या रोजच्या घडामोडीत अशा अनेक गोष्टी घडतात. ज्या कधीही पाहिलेल्या नसतात आणि ऐकलेल्याही नसतात. परंतु काही गोष्टी अशा असतात, ज्या त्याबद्दल विचार करण्याची आणि समजून घेण्याची पद्धती मात्र जुन्याच असतात. तर ऐका मग, तुम्ही कधी पुरुषाने बाळाला जन्म दिल्याच ऐकलंय का? हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य (Surprise) वाटत असेल पण तुम्ही जे ऐकलयं ते खरं आहे. अलिकडे ट्रान्सजेंडर पुरुषाने (Transgender men) चक्क बाळाला जन्म दिला आहे. ही घटना अमेरिकेमधील आहे.

चक्क 37 वर्षाच्या पुरुषाने दिला बाळाला जन्म
सोशल मीडिया खरंच पूर्णपणे बंद झाला तर? कसं असणार त्यानंतरचं जग

अमेरिकेतील (America) 37 वर्षीय बेनेट कास्पर विल्यम्स (Bennett Caspar Williams) हे लॉस एंजेलिसचे (Los Angeles) रहिवासी आहेत. ते एक ट्रान्सजेंडर पुरुष (Transgender men)आहे. यावेळी बेनेट म्हणाले की, सात वर्षापूर्वी ते एक महिला (Women) होते. मात्र शस्त्रक्रिया (Surgery) करुन तीन लाखांहून अधिक खर्च करुन त्यांनी स्तनावर उपचार करुन घेतले. परंतु मुलाला जन्म देणाऱ्या महिलेच्या अंगामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीयेय. तसेच पुढे बेनेट म्हणाले की, त्यांना मातृत्वाचा आनंद घ्यायचा होता म्हणून त्याने असे केले आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतर, ट्रान्सजेंडर पुरुषाने सांगितले की, मी एक पुरुष असून मी मुलाला जन्म दिलाय. त्यामुळे मला वाटते की, तुम्ही गर्भधारणा स्त्री असण्याशी जोडणं थांबवल गेलं पाहिजे.

चक्क 37 वर्षाच्या पुरुषाने दिला बाळाला जन्म
मित्रांनो, सोशल मीडिया सोडा, स्वतःला घडवा

बेनेट कास्पर विल्यम्स यांनी सांगितलं की, 2011 मध्ये पहिल्यांदा समजलं की तो ट्रान्स (Trans) आहे. परंतु पुढील तीन वर्षात त्याने स्वत: मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यानंतर 2017मध्ये तो त्याचा भावी पती मलिकला भेटला आणि दोघं 2019मध्ये विवाह केला. लग्नानंतर या जोडप्याला मूलं हवं होत. त्यासाठी बेनेटने टेस्टोरॉन हार्मोन थेरपी (Testosterone hormone therapy) घेतली. या थेरपीच्या माध्यमातून बेनेटची अंडाशय काम करु लागली कारण त्याची बॉटम शक्त्रक्रिया झाली नव्हती.

2020 मध्ये त्याने त्याचा मुलगा हडसन याला जन्म दिला. अलीकडेच बेनेटने बाळंतपणादरम्यानचा एक विचित्र अनुभव शेअर केला आणि सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपला राग व्यक्त केला. त्याने सांगितलं की 'हॉस्पिटलमधील लोक मला बाळाचे वडिल म्हणण्याऐवजी बाळाची आई म्हणू लागले. मातृत्वाची (Motherhood) भावना ही केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे लोकांच्या वक्तव्याचा मला विलक्षण राग आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com