esakal | बापरे! एका पाईप दुरुस्तीचं बिल चक्क ४ लाख

बोलून बातमी शोधा

बापरे! एका पाईप दुरुस्तीचं बिल चक्क ४ लाख
बापरे! एका पाईप दुरुस्तीचं बिल चक्क ४ लाख
sakal_logo
By
शर्वरी जोशी

अनेकदा घरातील एखादा पाईप तुटला, नळ लिकेज झाला तर आपण लगेच प्लंबरला बोलावतो. आता साधारणपणे एका पाईपच्या दुरुस्तीमागे प्लंबर (plumber) २०० ते ३०० रुपये आकारतो. परंतु, एक साधा पाईप दुरुस्तीसाठी तुमच्याकडून कोणी लाखो रुपयांचं बील (bill) घेतलं आहे? अर्थात नाही. असं केलं तर लोक आपल्याला वेड्यात काढतील. पण, प्रत्यक्षात अशी एक घटना घडली आहे. एका प्लंबरने किरकोळ दुरुस्तीसाठी एका विद्यार्थ्याला चक्क ४ लाखांचं बील दिलं आहे. (viral news plumber britain took massive amount money and bill going viral)

सोशल मीडियावर चर्चेत आलेला हा धक्कादायक प्रकार ब्रिटनमध्ये (britain) घडला आहे. हँट्समध्ये राहणाऱ्या एश्ले डगलस या विद्यार्थ्याच्या घरातील पाईप लिकेज झाला होता. म्हणून त्याने तो दुरुस्त करण्यासाठी प्लंबरला घरी बोलावलं होतं. विशेष म्हणजे पाईप दुरुस्त झाल्यावर या प्लंबरने एश्लेच्या हातावर चक्क ४ लाखांचं बील ठेवलं.

हेही वाचा: लस घेतल्यावर हेवी ड्रिंक करताय? वेळीच थांबा, नाहीतर...

"किचन सिंकला जोडलेला पाईप तुटल्यामुळे माझ्या किचनमध्ये खूप पाणी साचत होतं. नंतर हळूहळू किचनमध्ये पाणी प्रमाणापेक्षा जास्त साचू लागलं. म्हणून मग मी पी.एम. प्लंबर सर्व्हिसच्या मेहदी पैरवी यांना फोन करुन घरी बोलावून घेतं. त आल्यानंतर प्रथम मी त्यांना अंदाजे किती खर्च येईल असं विचारलं होतं. परंतु, त्यांनी उत्तर दिलं नाही आणि थेट काम करण्यास सुरुवात केली. काम झाल्यावर त्यांनी माझ्या हातावर ३९०० पाऊंडस म्हणजे जवळपास ४ लाख रुपये इतक्या बीलाची पावती ठेवली",असं एश्लेने एका मुलाखतीत सांगितलं.

नेमकं चार लाखांचं बील का?

एका पाईप दुरुस्तीचं बील इतकं कसं काय?, असा प्रश्न विचारल्यावर मेहदी यांनी भन्नाट उत्तर दिलं. "१ तास काम केल्यावर मी त्या कामाचे १ कोटींदेखील घेऊ शकतो आणि त्यावर कोणाला आक्षेप असावा असं मला वाटत नाही. कारण, या कामासाठी मी माझं ज्ञान आणि कौशल्य दोन्ही वापरत असतो", असं मेहदी यांनी सांगितलं. या प्रकारानंतर, एश्लेने पोलिसांकडे धाव घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.