
Vladimir Putin
sakal
मॉस्को - रशियाकडून खनिज तेलाच्या खरेदीप्रकरणी भारतावर सातत्याने दबाव आणणाऱ्या अमेरिकेला अध्यक्ष पुतीन यांनी खडे बोल सुनावतानाच भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. ‘भारत कुणासमोरही झुकणार नाही तसेच स्वतःचा अवमान होऊ देणार नाही,’ असे त्यांनी नमूद केले.