Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

Russia And West: पुतिन यांनी यापूर्वी 2000 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ते 2004, 2012 आणि 2018 मध्येही राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.
Vladimir Putin
Vladimir PutinEsakal

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथील ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये सलग पाचव्या वेळी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. विशेष बाब म्हणजे याच ठिकाणी रशियाच्या झार घराण्यातील तीन राजे (अलेक्झांडर दुसरा, अलेक्झांडर तिसरा आणि निकोलस दुसरा) यांचा राज्याभिषेक झाला होता.

पुतिन यांच्या शपथविधी आणि राष्ट्रगीतानंतर लष्कराने त्यांना 21 तोफांची सलामी दिली. पुतिन यांनी यापूर्वी 2000 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ते 2004, 2012 आणि 2018 मध्येही राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. (Vladimir Putin)

शपथविधीनंतर पुतिन म्हणाले की, जे देश आम्हाला शत्रू मानतात त्यांच्याशी आम्ही आमचे संबंध अधिक मजबूत करू.

रशियामध्ये 15-17 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत पुतिन यांना 88% मते मिळाली तर त्यांचे विरोधक निकोले खारिटोनोव्ह यांना फक्त 4% मते मिळाली.

मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, ब्रिटन आणि अनेक युरोपीय देशांनी पुतिन यांच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.

Vladimir Putin
Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

आम्ही पाश्चिमात्य देशांशी चर्चेसाठी तयार आहोत, असे पुतीन यांनी शपथविधीनंतर झालेल्या आपल्या भाषणात सांगितले. त्यांना आमच्याशी संवाद साधायचा आहे की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

ते म्हणाले की, "पाश्चात्य देशांनी रशियाचा विकास रोखण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. वर्षानुवर्षे ते आमच्याविरुद्ध आक्रमक वृत्ती स्वीकारत आहेत. परंतु आम्ही युरोप आणि आशियातील आमच्या मित्र राष्ट्रांसह बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी काम करत राहू. सर्व देशांमध्ये समान सुरक्षा व्यवस्था असावी अशी आमची इच्छा आहे. स्वातंत्र्य आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी, रशियाची सामाजिक-राजकीय व्यवस्था लवचिक असणे आवश्यक आहे. कोणत्याही आव्हानासाठी किंवा धोक्यासाठी आपल्याला सदैव तयार राहावे लागते."

Vladimir Putin
Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

पुतिन यांनी शपथविधीनंतर केलेल्या भाषणात त्यांनी युक्रेनविरुद्ध गेल्या दोन वर्षांपासून लढत असलेल्या जवानांच्या कार्याचे कौतुक केले.

दरम्यान, युक्रेनने पुतिन यांच्या शपथविधी सोहळ्याचा निषेध केला आहे. पुतिन त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या राजवटीला कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी रशियाला आक्रमक राज्यामध्ये बदलून हुकूमशाही प्रस्थापित केल्याचा आरोप युक्रेनने केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com