
Ukraine Russia: झेलेन्स्की यांची बायडेनसोबत चर्चा; म्हणाले...
युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सध्या युद्ध सुरु असून रशियाने युक्रेनला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या रशियाने युक्रेनच्या किवी सह बाकीच्या शहरावर ताबा मिळवल्याचं ताज्या रिपोर्टनुसार समोर आलंय. यक्रेनवर रशियाचे सलग सहा दिवस बॉम्ब हल्ले सुरु आहेत. काल एका हल्ल्यात भारतीय विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे. (Russia Ukraine War Updates)
रशियाचे सैन्य युक्रेनच्या हद्दीत खूप आतपर्यंत घुसले आहेत. त्याचबरोबर त्यांचे हल्लेदेखील सुरु आहेत. दरम्यान युरोपीय देशांनी रशियावर बहिष्कार टाकला आहे. तसेच सध्या युक्रेनला अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी संपर्क साधला आहे. रशियाविरोधात लढण्यासाठीच्या प्रश्नावर त्यांनी बायडेन यांच्यासोबत चर्चा केली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, "रशियाविरोधातील निर्बंध आणि संरक्षण सहाय्य या विषयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासोबत चर्चा केली आहे.रशियाच्या या आक्रमनाला लवकरात लवकर रोखले पाहिजे असंही झेलेन्स्की म्हणाले. दरम्यान युक्रेनच्या मदतीसाठी अनेक देशांनी लष्करी मदत जाहीर केली आहे. तसेच अमेरिकेसह युरोपातील देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. आज युरोपीय संसदेतील बैठकीत झेलेन्स्की यांनी परिस्थितीवर भाष्य केले.
त्यानंतर युरोपीय संसदेतील युक्रेनचे सदस्यत्व मान्य केल्याचंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतूनही रशियाला काढून टाकण्यासाठी ब्रिटन सरकार तयार आहे, असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या प्रवक्त्यानं मंगळवारी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या प्रतिक्षेत आहे अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
तसेच या संकटाला दोन हात करण्यासाठी युक्रेनने आंतरराष्ट्रीय लष्करी तुकडी स्थापण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
Web Title: Vladimir Zelensky Joe Biden Call Russia Crisis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..