
ट्रम्प यांच्याविरोधात मांडल्या गेलेल्या महाभियोगाच्या ठरावावर बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) मतदान होणार आहे.आपल्या समर्थकांना चिथावणी दिल्याने कॅपिटॉलमध्ये हिंसाचार झाला, असा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे.
वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असलेल्या लोकप्रतिनिधीगृहात ट्रम्प यांच्याविरोधात मांडल्या गेलेल्या महाभियोगाच्या ठरावावर बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) मतदान होणार आहे. आपल्या समर्थकांना चिथावणी दिल्याने कॅपिटॉलमध्ये हिंसाचार झाला, असा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाभियोगाचा हा ठराव मंजूर होण्यास लोकप्रतिनिधीगृहात सामान्य बहुमताची आवश्यकता असून ते बहुमत डेमोक्रॅटिक पक्षाकडे आहे. मात्र, सिनेटमध्ये दोन तृतियांश बहुमताची गरज असते. सध्या या सभागृहात दोन्ही पक्षांची समान ५० मते आहेत. सिनेटमध्ये ठरावावरील मतदान २० जानेवारीपूर्वी होऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, कॅपिटॉलमधील हिंसाचारानंतर ट्रम्प आणि माइक पेन्स यांची प्रथमच भेट झाली. पेन्स यांनी हिंसाचारावर टीका केली होती. या हिंसाचाराचा निषेध करताना देशाचे हंगामी अंतर्गत सुरक्षा मंत्री चॅड वूल्फ यांनी आज पदाचा राजीनामा दिला आहे. देशात हिंसाचार भडकण्याची शक्यता असतानाच या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या खात्याच्या मंत्र्यांनीच राजीनामा दिला.