नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल असे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म त्रिनिदाद येथे झाला. त्यांचे वडील सुरजप्रसाद हे त्रिनिदाद गॉर्जियनमध्ये पत्रकार होते आणि लेखकही होते. त्यांचे शिक्षण शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफोर्ड विद्यापीठात ब्रिटीश साहित्यात झाले. त्यानंतर ते लंडनमध्येच वास्तव्यास होते. नायपॉल यांनी 1955 मध्ये पेट्रीसिया एन हेल यांच्याशी विवाह केला होता. पण, त्यांचे 1996 मध्ये निदन झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी पत्रकार नादिरा अल्वी यांच्याशी विवाह केला. 

लंडन : नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक व्ही. एस. नायपॉल (वय 85) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले.

नायपॉल यांच्या पत्नीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की व्ही. एस. नायपॉल यांची प्रत्येक पुस्तके महान आहेत. त्यांचे पूर्ण आयुष्य अद्भूत रचना बनविण्यात गेले. ते कायम नागरिकांवर प्रेम करत राहिले. 

विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल असे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म त्रिनिदाद येथे झाला. त्यांचे वडील सुरजप्रसाद हे त्रिनिदाद गॉर्जियनमध्ये पत्रकार होते आणि लेखकही होते. त्यांचे शिक्षण शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफोर्ड विद्यापीठात ब्रिटीश साहित्यात झाले. त्यानंतर ते लंडनमध्येच वास्तव्यास होते. नायपॉल यांनी 1955 मध्ये पेट्रीसिया एन हेल यांच्याशी विवाह केला होता. पण, त्यांचे 1996 मध्ये निदन झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी पत्रकार नादिरा अल्वी यांच्याशी विवाह केला. 

नायपॉल यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांना अनेक मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना 1971 मध्ये बुकर पुरस्कार देण्यात आला. तर, 2001 मध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला. 'ए बेंड इन द रिव्हर', 'अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास' ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यांचे 'द मिस्टिक मैसर' हे त्यांचे पहिले पुस्तक 1951 मध्ये प्रसिद्ध झाले होते. नायपॉल यांचे लेखन सुरवातीला वेस्ट इंडीज केंद्रीत होते. पण, नंतर त्याला जागतिक रुप मिळाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 30 हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये 'इन ए फ्री स्टेट (1971)', 'ए वे इन द वर्ल्ड (1994)', 'हाफ ए लाईफ (2001)' आणि 'मॅजिक सीड्स (2004)' ही महत्त्वाची आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VS Naipaul Fiery Novelist And Nobel Laureate Dies At 85