टिकटॉकसाठी वॉलमार्टही इच्छुक

वृत्तसंस्था
Saturday, 29 August 2020

वॉलमार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमची आणि मायक्रोसॉफ्टची भागीदारी अमेरिकी टिकटॉक यूजरच्या अपेत्रा पूर्ण करू शकेल, त्याचवेळी अमेरिका सरकारच्या नियमन अधिकाऱ्यांचेही समाधान करेल असा विश्वास वाटतो.

न्यूयॉर्क - टिकटॉकचे अमेरिकेतील व्यवहार मिळवण्यासाठी मायक्रॉसॉफ्टच्या जोडीला वॉलमार्टने उडी घेतली आहे. रिटेल क्षेत्रातील या बलाढ्य कंपनीला हा करार झाल्यास आपला व्यवसाय विस्तारण्यास फायदा होण्याची आशा आहे.

अमेरिकेतील व्यवसाय 90 दिवसांत अमेरिकी कंपनीला विकावा अथवा बंदीला सामोरे जावे असा आदेश अमेरिकेचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला आहे. यूजरची माहिती चीनला पुरवीत असल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे. टिकटॉकने ते फेटाळून लावला आहे.

वॉलमार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमची आणि मायक्रोसॉफ्टची भागीदारी अमेरिकी टिकटॉक यूजरच्या अपेत्रा पूर्ण करू शकेल, त्याचवेळी अमेरिका सरकारच्या नियमन अधिकाऱ्यांचेही समाधान करेल असा विश्वास वाटतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मायक्रोसॉफ्टने टिकटॉकच्या खरेदीसाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीर केले होते. वॉलमार्टच्या संदर्भातील घडामोडीनंतर कोणताही तपशील पुरविण्यास नकार दर्शविण्यात आला. वॉलमार्टकडे ब्रिटनमधील सुपरमार्केटच्या साखळीची मालकी अॅस्डाच्या साथीत संयुक्तरित्या आहे. आता टिकटॉकसाठी अमेरिकी कंपनी ओरॅकलशी त्यांना शर्यत करावी लागेल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोठी कमाई होणार
2018च्या अखेरीस जागतिक पातळीवर लाँच झालेल्या टिकटॉकने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता कमावली. प्रामुख्याने 25 वर्षांखालील युवा वर्ग त्याकडे आकर्षित झाला आहे. अमेरिकेतील व्यवसायाचे हक्क मिळविणाऱ्या कंपनीला 30 अब्ज डॉलरची कमाई होईल असे वृत्त आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Walmart has jumped on the bandwagon of Microsoft to acquire TickTock in the US