
नवी दिल्ली: पुढच्या आठवड्यात दिल्लीत मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत असून, ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्याशी चर्चा करणार आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगाने बदल होत असताना हा दौरा होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे, अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे ते पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारत आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि चीनची वाढती जवळीक त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरू शकते.