भारत आणि चीन यांच्यात युद्ध अशक्य

India-and-China
India-and-China

नवी दिल्ली - भारत चीनचा सीमाप्रश्न चिघळल्याने उभय देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे. डोकलामनंतर प्रथमच दोन्ही देशांनी इतक्या प्रदीर्घकाळ परस्परांवर बंदुका रोखल्याने युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. हा तणाव भविष्यात आणखी  वाढणार असला तरीसुद्धा दोन्ही देशांत १९६२ साली झाले तसे युद्ध होण्याची शक्यता कमीच असल्याचे संरक्षणक्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चीनला जगावर स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करायचे आहे. आज ज्या स्थानी अमेरिका आहे ते स्थान बळकावण्याचा  चीनचा प्रयत्न असल्याची माहिती माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.  चेन्नई आंतरराष्ट्रीय केंद्राच्या वतीने आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत ते बोलत होते.

दरम्यान सीमाप्रश्नाबाबत भारत आणि चीन हे दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडविण्यावर ठाम आहेत. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांच्याशी तडजोड करण्याची त्यांची तयारी नाही. मध्यंतरी सीमेवरील तणावाबाबत  भाष्य करणारे असंख्य व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाले होते त्यात भारत आणि चिनी सैनिकांत मारहाण झाल्याचा दावाही  करण्यात आला होता.

'दोन्ही देश त्यांच्या हद्दीत पायाभूत सुविधांची उभारणी करत आहेत. ते परस्परांची क्षमता आजमावून पाहत असून अशा प्रकारचा तणाव त्यांच्या द्विपक्षीय संबंधाचा भाग बनला आहे, " असे ली कुआन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी या संस्थेतील अभ्यासका जेम्स कार्बट्री यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com