२० वर्षापासूनचं युद्ध संपलं, अमेरिकन सैन्याने सोडलं अफगाणिस्तान

ज्या तालिबान विरोधात लढाई सुरु केली, त्यांच्याकडेच देश सोपवून अमेरिकेला निघावं लागलं, हे दुर्देव आहे.
war
war

काबुल: अमेरिकन सैन्याची (american army) अफगाणिस्तानातून सैन्य (afganistan) माघारीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व अमेरिकन सैन्य मायदेशी परतलं आहे. ठरलेल्या मुदतीच्या एकदिवस आधीच अमेरिकन सैन्याने आपल्या सर्व नागरिकांसह अफगाणिस्तान सोडलं. अशाप्रकारे अमेरिकन सैन्य अमेरिकेतून निघाल्यामुळे मागच्या २० वर्षापासून सुरु असलेलं युद्ध संपल्यात (war over) जमा आहे. २००१ च्या सप्टेंबर महिन्यात वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर (world trade center attack) झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेची दहशतवादाविरोधात लढाई सुरु झाली.

अलकायदाचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन ९/११ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. या लादेनला शोधून काढण्यासाठी अमेरिकन फौजा अफगाणिस्तानात घुसल्या आणि युद्धाची सुरुवात झाली. तालिबाननेच लादेनला आश्रय दिला होता. त्यामुळे अमेरिकेने तालिबानची सत्ता हटवली पण आज २० वर्षानंतर त्याच तालिबानच्या हाती देश सोपवून अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावं लागलं, हे दुर्देव आहे.

war
पुणे-कोल्हापूर प्रवास अडीच तासांत; केंद्राची वेगवान योजना

तालिबान सत्तेवर येणार हे स्पष्ट झाल्यानंतर काबुल विमानतळावर काय घडलं? तिथे काय परिस्थिती आहे, ती दृश्य जगाने पाहिली. आजही सर्वसामान्य अफगाणि जनता अफगाणिस्तानबाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांना तालिबानची जुलमी राजवट कदापी मान्य नाहीय. अमेरिकन सैन्य तब्बल २० वर्ष म्हणजे दोन दशक अफगाणिस्तानात होतं. अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करुनही अमेरिकेला तिथून दहशतवाद संपवता आला नाही. त्यांनी अफगाणि सैन्य उभं केलं. पण भ्रष्टाचार आणि राष्ट्रभक्तीचा अभाव यामुळे या सैन्याने तालिबानशी दोन हात करण्याऐवजी शस्त्र टाकून पळ काढला.

war
२०२४ मध्ये मोदी वि. नितीश?

काबूलचं विमानतळ आता तालिबानच्या ताब्यात आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानी आता हवेत गोळीबार करुन जल्लोष साजरा करत आहेत. "शेवटचा अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानातून निघाला असून आमच्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे" असे तालिबानी प्रवक्ता कारी युसूफ अल जझीरा टीव्हीशी बोलताना म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com