सरते वर्ष रशियासाठी सर्वांत उष्ण

पीटीआय
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

हवामान प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा रशियाचे सरासरी तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते. आधीच्या सर्वांत उष्ण वर्षापेक्षा हे तापमान ०.३ अंशांनी अधिक आहे. मॉस्कोतील वातावरणाची १८७९ पासून, तर संपूर्ण रशियातील तापमानाची १८९१ पासून नोंद ठेवण्यात आली आहे. तेव्हापासूनची आकडेवारी पाहिल्यास यंदाचे वर्ष सर्वांत उष्ण होते, असे विल्फंड म्हणाले.

मॉस्को - जागतिक पातळीवर तापमानात वाढ होत असताना रशियासाठीही सरते वर्ष सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे, असे रशियाचे हवामानप्रमुख रोमन विल्फंड यांनी आज सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हवामान प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा रशियाचे सरासरी तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते. आधीच्या सर्वांत उष्ण वर्षापेक्षा हे तापमान ०.३ अंशांनी अधिक आहे. मॉस्कोतील वातावरणाची १८७९ पासून, तर संपूर्ण रशियातील तापमानाची १८९१ पासून नोंद ठेवण्यात आली आहे. तेव्हापासूनची आकडेवारी पाहिल्यास यंदाचे वर्ष सर्वांत उष्ण होते, असे विल्फंड म्हणाले. जागतिक पातळीवरही २०१९ हे सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक होते. बोचऱ्या थंडीसाठी मॉस्को प्रसिद्ध आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंतच सर्व मॉस्को शहर बर्फाची दुलई पांघरते. यंदाचा डिसेंबर मात्र गेल्या शतकातील सर्वांत उबदार डिसेंबर महिना होता. 

महिला आणि पुरुषांमध्ये कोण अधिक खोटारडे?, पाहाच... 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र आपल्या कामकाजात कधीही अशा हिमवृष्टीचा अडथळा येऊ दिला नाही. यंदा मात्र त्यांनी वर्षाअखेरीच्या पत्रकार परिषदेत, वातावरण बदलाची नोंद घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The warmest for Russia in the end of the year