Video: कमजोर हृदयाच्या लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये...

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

कोळीच्या पिल्ले अंड्यामधून निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. Australian Reptile Park ने हा व्हिडिओ बुधवारी (ता. 9) पेजवर अपलोड केला असून, 10 लाखांहून अधिका नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सिडनी : कोळीच्या पिल्ले अंड्यामधून निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. Australian Reptile Park ने हा व्हिडिओ बुधवारी (ता. 9) पेजवर अपलोड केला असून, 10 लाखांहून अधिका नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

"वेगवेगळ्या पक्ष्यांना अंड्यातून निघताना अनेकदा पाहिले असेल. पण कधी तुम्ही कोळीच्या पिल्लांना अंड्यातून निघताना पाहिले का? हा प्रश्न विचारला आहे. व्हिडिओत एक अंडे दिसत आहे. अंडे उघडल्यानंतर त्यामधून अनेक कोळी बाहेर येताना दिसत आहेत.

Australian Reptile Park ने हा व्हिडीओ शेअर करताना सूचना दिली होती की, कमजोर हृदयाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये. हा व्हिडीओ सुरूवातीला फारच नॉर्मल वाटतो. पण नंतर जसाजसा व्हिडीओ पुढे जातो, तसतसे अंगावर शहारे येऊ लागतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: warning not faint hearted dozens spiders emerge egg case video goes viral