भारत-अमेरिका व्यापारी संबंध संघर्षाचे; ट्रम्प प्रशासनाचे मत

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

वॉशिंग्टन : भारत-अमेरिका व्यापारी संबंध संघर्षाचे झाले असल्याचे मत व्हाईट हाउसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांमध्ये मुक्त, न्याय्य व परस्परपूरक व्यापार होण्यासंबंधी पावले उचलली जात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. भारताकडून महागड्या दुचाकींच्या आयातीवर कर वाढविल्याचा मुद्दा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिकरीत्या उपस्थित केल्यानंतर व्हाईट हाउसकडून व्यापारी संबंधांवर भाष्य करण्यात आले.

""दोन्ही देशांकडून परस्परसंबंधांबाबत वचनबद्धता मजबूत आहे. मात्र जेव्हा व्यापाराचा मुद्दा उपस्थित होतो त्या वेळी संबंध संघर्षाचे असल्याचे निदर्शनास येते,'' असे सांगण्यात आले. या वेळी व्हाईट हाउसकडून दक्षिण आशियातील विविध मुद्द्यांचे स्पष्टीकरण करण्यात आले. भारतासोबतच्या व्यापारी तुटीसंदर्भातही व्हाईट हाउसने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा आयातीनंतर ही व्यापारी तूट भरून निघत असल्याचेही व्हाईट हाउसकडून स्पष्ट करण्यात आले. ट्रम्प प्रशासनाकडून व्यापारी मुद्द्यावर सातत्याने भारत सरकारशी बोलणी सुरू असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये असताना अमेरिकेचे व्यापारी विभागाचे प्रतिनिधी रॉबर्ट लायटीझर यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washington news india usa Business relationship donald trump