'जगातील सर्वाधिक फेक ट्विट फॉलोअर्स मोदींचेच'

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

वॉशिंग्टनः सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर जगातील सर्वाधिक फेक फॉलोअर्स भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत, असा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे.

जागतीक स्तरावर ट्विटरचे सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱया टॉप तीनमध्ये कॅथॉलिक चर्चचे पोप फ्रान्सिस, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. परंतु, यामध्ये फेक फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक आहे. ट्विटरवर नरेंद्र मोदी यांचे 60 टक्के तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 37 टक्के फेक फॉलोअर्स आहेत, असे न्यूजलॉण्ड्री या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

ट्विटरवर ट्रम्प यांचे 47.9 मिलियन फॉलोअर्स असून, त्यापैकी 37 टक्के हे फेक फॉलोअर्स आहेत. नरेंद्र मोदी यांचे 40.3 मिलियन फॉलोअर्स असून, त्यापैकी 60 फॉलोअर्स हे फेक आहेत. पोप फ्रान्सिस यांचे 16.7 मिलियन फॉलोअर्स असून 59 टक्के फेक फॉलोअर्स आहेत, अशी माहिती ट्विटर ऑडिट.कॉम व ट्विप्लोमॅसीने दिली आहे. यामुळे ट्विटरवर जगातील सर्वाधिक फेक फॉलोअर्स भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत.

भारतामध्ये मोदी यांच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सर्वाधिक चाहते आहेत. परंतु, केजरीवाल यांचेही 51 टक्के फेक फॉलोअर्स आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे सर्वाधिक 69 टक्के फेक फॉलोअर्स आहेत, अशी माहिती आऊटलूक केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washington news PM Modi is global leader in fake Twitter followers