पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याची अमेरिकेची घोषणा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

वॉशिंग्टन : येत्या दोन दिवसांत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचे सूतोवाच आज अमेरिकेने केले. व्हाइट हाउसच्या प्रेस सचिव सारा सॅंडर्स यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना अमेरिकेच्या दक्षिण आशियाबाबतच्या रणनीतीची माहिती दिली. जेरुसलेमच्या मुद्यावर पाकिस्तान आणि ज्या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेला साथ दिली नाही, त्या देशांविरुद्ध अमेरिका लवकरच कारवाई सुरू करेल, असे म्हटले आहे. तत्पूर्वी ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला दिली जाणारी 25.5 कोटी डॉलरची मदत दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या कारणावरून स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

वॉशिंग्टन : येत्या दोन दिवसांत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचे सूतोवाच आज अमेरिकेने केले. व्हाइट हाउसच्या प्रेस सचिव सारा सॅंडर्स यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना अमेरिकेच्या दक्षिण आशियाबाबतच्या रणनीतीची माहिती दिली. जेरुसलेमच्या मुद्यावर पाकिस्तान आणि ज्या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेला साथ दिली नाही, त्या देशांविरुद्ध अमेरिका लवकरच कारवाई सुरू करेल, असे म्हटले आहे. तत्पूर्वी ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला दिली जाणारी 25.5 कोटी डॉलरची मदत दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या कारणावरून स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे, असे सॅंडर्स यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी ट्रम्प यांनी दक्षिण आशियाबाबत धोरण निश्‍चित केले होते आणि त्यानुसारच पाकिस्तानविरुद्ध कारवाई करावी लागत असल्याचे त्या म्हणाल्या. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियासाठी ऑगस्टमध्ये रणनीती तयार केली होती. पाकिस्तान आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत नसल्याचा मुद्दा रणनीती तयार करताना उपस्थित झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली. ट्रम्प हे धोरणाचे पालन करत आहेत. दहशतवाद्यांविरुद्ध पाकिस्तान मोठी कारवाई करू शकतो आणि या दृष्टीने पाकिस्तानने पावले उचलावीत, असे आम्हाला वाटते, असे सॅंडर्स म्हणाल्या. पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध कडक करण्याच्या दृष्टीने व्हाइट हाउसने मदतनिधी थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washington news usa announcement to take action against Pakistan