esakal | सुपरफास्ट! तिने मोडला सर्वांत वेगाने हॉटडॉग खाण्याचा विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

सुपरफास्ट! तिने मोडला सर्वांत वेगाने हॉटडॉग खाण्याचा विक्रम

सुपरफास्ट! तिने मोडला सर्वांत वेगाने हॉटडॉग खाण्याचा विक्रम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आपण केलेल्या कामाची दखल केवळ आपल्या आप्तेष्टांनीच न घेता संपूर्ण जगाने घ्यावी असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी अनेक जण प्रयत्नही करत असतात. नावलौकिक मिळावा यासाठी काही जण चक्क वर्ल्ड रेकॉर्डही करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आतापर्यंत ध्येयाने झपाटलेल्या अनेकांनी जगावेगळी कामं करुन गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) स्वत: च्या नावाची नोंद केली आहे. यामध्येच सध्या एक महिला चर्चेत आली आहे. या महिलेने हात न लावता एक संपूर्ण हॉटडॉग कमी कालावधीत खाऊन दाखवलं आहे. विशेष म्हणजे तिच्या कार्याची दखल गिनिज वर्ल्ड बूकने घेतली असून तिच्या नावाचा समावेश वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे. (watch-uk-woman-breaks-records-for-fastest-time-to-eat-hot-dog-with-no-hands)

अलिकडेच गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने त्यांच्या इन्स्टाग्रामवर Leah Shutkever या महिलेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला हाताचा वापर न करता हॉट डॉग खात आहे. विशेष म्हणजे तिने 18.15 सेकंदामध्ये संपूर्ण हॉटडॉग संपवलं आहे. Leah Shutkever ने ११ एप्रिल २०२१ मध्ये हे रेकॉर्ड केला होता. त्यानंतर २६ मे रोजी गिनिज वर्ल्ड बूक रेकॉर्डच्या पेजवर तिचा व्हिडीओ शेअर करण्यात आला.

दरम्यान, युकेमध्ये राहणाऱ्या या महिलेने जलद गतीने हे हॉटडॉग खाऊन रेकॉर्ड ब्रेक केला आहे.