मंगळावरचं पाणी गेलं कुठे? ; नासाने केला खुलासा

water mars nasa thinks trapped under its surface viks
water mars nasa thinks trapped under its surface viks

गेल्या काही काळामध्ये मंगळावरील संशोधनात झपाट्याने वाढ झाली आहे.  यामध्येच प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनीही पुढील काही वर्षांमध्ये मंगळावर मानवी वसाहत उभी करणार असल्याचं निश्चिय केला आहे. अलिकडेच नासाचे पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळावर यशस्वीरित्या उतरविण्यात आले असून तेथील मंगळाच्या पृष्ठभागाची दृष्ये आणि माहिती पाठवायला सुरुवात केली आहे. यामध्येच आता मंगळावर एकेकाळी पाण्याचा मुबलक साठा होता. परंतु, हा साठा आता कमी होत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हे पाणी दिवसेंदिवस कमी का होतंय याचा खुलासा नासाने केला आहे. 

अनेक वर्षांपूर्वी मंगळावर समुद्र आणि नद्या मोठ्या प्रमाणावर होत्या. मात्र, आता हा मंगळ ग्रह शुष्क खडकासारखा कोरडा झाला आहे. हळूहळू यावर असलेल्या पाण्याचा साठा कमी झाला आहे.  त्यामुळे हे पाणी नेमकं कुठे जातंय हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. याविषयी अनेक मतमतांतरेदेखील करण्यात आली. यामध्येच आता नासाने यामागील सत्य समोर आणलं आहे.

मंगळावर असलेलं पाणी तेथे असलेल्या खनिजांमध्ये लुप्त होत आहे. मंगळावर मोठ्या प्रमाणावर हायड्रेटेड  खनिज असल्यामुळे यात सगळं पाणी झिरपत आहे. त्यामुळे जवळपास ३० ते ९९ टक्के पाणी या खनिजांमध्ये झिरपल्याचं सांगण्यात येतं.  तसंच काही वैज्ञानिकांच्या मते या पाण्याचा साठा नष्ट झाला आहे. तर, काहींच्या मते, हे पाणी मंगळावरच असून तेथे झिरपलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com