भारतातील बीबीसी कार्यालयांच्या सर्व्हेवर ब्रिटन सरकारची पहिली प्रतिक्रिया; काय म्हटलंय वाचा? : BBC Survey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishi Sunak

BBC Survey : भारतातील बीबीसी कार्यालयांच्या सर्व्हेवर ब्रिटन सरकारची पहिली प्रतिक्रिया; काय म्हटलंय वाचा?

लंडन : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) या जगातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थेच्या भारतातील कार्यालयांचं इन्कम टॅक्स विभागाकडून कर सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामुळं देशभरात खळबळ उडाली आहे. यावरुन उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या आहेत. यावर आता युकेच्या सरकारनं अर्थात ऋषी सूनक सरकारनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (We are closely monitoring reports of tax surveys conducted at the offices of the BBC in India says UK Govt)

आम्ही भारतातील बीबीसीच्या कार्यालयात केलेल्या कर सर्वेक्षणाच्या अहवालांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत, असं युकेच्या सरकारी सुत्रांनी म्हटलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई इथल्या कार्यालयांवर सोमवारी सकाळी अचानक सर्व्हेक्षण करण्यात आलं.

बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभगानं छापे टाकले, या धाडीत इन्कम टॅक्सच्या आधिकऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतले होते. ५० हून अधिक आधिकरी आणि कर्मचारी या सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते.

बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद

काही दिवसांपूर्वी बीबीसी या प्रसारण संस्थेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एक डॉक्युमेंट्री युट्यूबवर रिलीज केली होती. यानंतर भारत सरकारनं ती तातडीनं हटवली होती. या डॉक्युमेंट्रीतून बीबीसीनं भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या या कृतीवर देशभरातून सरकारवर टीकेची झोड उठली होती.