Bhagat Singh Koshyari: शिवजयंतीपूर्वीच कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार, नव्या राज्यपालांचा 'या' दिवशी शपथविधी?

अनेक वादग्रस्त विधानांमुळं राज्यभरात संताप व्यक्त होत होता. तसेच राज्यपालांना हटवण्याची मागणीही करण्यात येत होती.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyarisakal

मुंबई : अनेक वादग्रस्त विधानांमुळं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त होत होता. तसेच राज्यपालांना हटवण्याची मागणीही करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतःहून आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून त्यांच्याजागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या शपथविधीची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. (Bhagat Singh Koshyari will leave Maharashtra before Shiv Jayanti)

Bhagat Singh Koshyari
Kasba By Election: कसब्याचा गड राखण्यासाठी भाजपचे संकटमोचक मैदानात; घेतली गुप्त बैठक

सूत्रांच्या माहितीनुसार, नवनियुक्त राज्यपाल बैस यांचा थपथविधी १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचाच अर्थ असा की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणारे आणि याचमुळं अडचणीत आलेले मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवजयंतीपूर्वीच अर्थात १९ फेब्रुवारीपूर्वीच महाराष्ट्रातून जाणार आहेत.

Bhagat Singh Koshyari
Amit Shah: केंद्रीय तपास एजन्सीजचा खरंच गैरवापर होतोय का? शहांनी स्पष्टचं सांगितलं

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त विधानं केली होती. यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच गुजरातींचं समर्थन करताना महाराष्ट्राला कमी लेखल्याचं विधान त्यांनी केलं होतं.

Bhagat Singh Koshyari
BBC IT Raid: बीबीसीवरील छापेमारीनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ; वाचा काय म्हणताहेत नेटकरी

शिवाजी महाराजांबद्दल वारंवार वादग्रस्त बोलल्यानं त्यांच्याविरोधात नागरिकांसह विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांना पदावरुन हटवण्याची जोरदार मागणी देखील करण्यात येत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com