
‘वॉशिंग्टन पोस्ट’चे दिवंगत पत्रकार जमाल खाशोगी यांच्या मारेकऱ्यांना त्यांच्या कुटुंबाने माफ केले असून याप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या सौदी अरेबिया सरकारच्या पाच हस्तकांना सोडून देण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. जमाल यांचे पुत्र सलाह यांनी मारेकऱ्यांना आपल्या कुटुंबाने माफ केल्याचे ट्वीटरवरुन जाहीर केले आहे.
दुबई - ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे दिवंगत पत्रकार जमाल खाशोगी यांच्या मारेकऱ्यांना त्यांच्या कुटुंबाने माफ केले असून याप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या सौदी अरेबिया सरकारच्या पाच हस्तकांना सोडून देण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. जमाल यांचे पुत्र सलाह यांनी मारेकऱ्यांना आपल्या कुटुंबाने माफ केल्याचे ट्वीटरवरुन जाहीर केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जमाल खाशोगी यांची २०१७ मध्ये तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या झाली होती. त्यांचा मृतदेह अद्यापपर्यंत सापडलेला नाही. खाशोगी यांनी सौदीचे युवराज सलमान यांच्याविरोधात अनेक लेख लिहिल्याने या हत्येमागे त्यांचाच हात असल्याचा दावा केला जात होता.
जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा
जगभरातून प्रचंड टीका झाल्यावर सौदी सरकारने खूनाचा आरोप युवराजांच्या दोन सहकाऱ्यांवर ठेवत त्यांना पदावरून दूर केले आणि खून घडवून आणणाऱ्या पाच जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. सौदी अरेबियातच राहणाऱ्या सलाह यांना सरकारने नुकसानभरपाईही दिली होती. रमजानच्या महिन्यात परंपरेनुसारच आम्ही देवाला शरण जात आमच्या वडिलांची हत्या करणाऱ्यांना माफ करत आहोत, असे त्यांनी सांगितले.