What is Balochi Faloos?
esakal
बलुचिस्तानबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक दावे व्हायरल होत आहेत. काही पोस्टमध्ये बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर बलुच गटांनी प्रांतातील सुमारे ८५ टक्के भागावर नियंत्रण मिळवल्याचा, नवीन प्रशासन, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि 'बलोची फालूस' नावाचे स्वतंत्र चलन सुरू केल्याचाही दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.