PM Modi in White House : PM मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी; या ‘स्टेट डिनर’चं अमेरिकेत आहे मोठं महत्त्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटवर आहेत. यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. पण यंदाचा दौरा का महत्त्वाचा आहे? या दौऱ्याला स्टेट व्हिजिट का म्हणतात?
PM Narendra Modi Joe Biden
PM Narendra Modi Joe Biden Sakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटवर आहेत. यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. पण यंदाचा दौरा का महत्त्वाचा आहे? या दौऱ्याला स्टेट व्हिजिट का म्हणतात? २२ जून रोजी मोदी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरही घेणार आहेत. याचा नक्की अर्थ काय? इतर मेजवान्यांपेक्षा याला इतकं महत्त्व का?जाणून घ्या....

स्टेट व्हिजिट म्हणजे काय?

स्टेट व्हिजिट म्हणजे अमेरिकेतला सर्वोच्च श्रेणीतला दौरा. हा दौरा औपचारिक निमंत्रणानुसार होतो. जो बायडन यांची सत्ता आल्यापासून स्टेट व्हिजिटवर येणारे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे तिसरे नेते आहेत. स्टेट व्हिजिटचं निमंत्रण दिलं जातं, ते अमेरिकेचे पाहुणे, जवळचे मित्र मानले जातात. या आधी फ्रान्स आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष स्टेट व्हिजिटवर येऊन गेले आहेत.

 या दरम्यान व्हाईट हाऊसमध्ये निमंत्रित पाहुण्यांना २१ बंदुकांच्या फैरी झाडत सलामी दिली जाते. तसंच त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या पेनसिल्व्हेनियाच्या गेस्ट हाऊसमध्ये निमंत्रित केलं जातं.

स्टेट डिनर म्हणजे काय?

स्टेट डिनर म्हणजे राष्ट्राध्यक्षांकडून स्टेट व्हिजिटवर असलेल्या पाहुण्यांना शाही मेजवानी दिली जाते. पाहुण्यांनी यजमानांच्या घरी जेवणं याला अमेरिकेमध्ये महत्त्व आहे. ही एक स्टेट व्हिजिटमधली महत्त्वाची परंपरा आहे. दोन देशांमधली मैत्री अबाधित राखण्यासाठी मित्रांसोबत एकत्र बसून जेवणं असं या परंपरेचं महत्त्व आहे.

स्टेट व्हिजिटचा इतिहास काय?

१८०० च्या शतकामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या मंत्र्यांना, संसद सदस्यांना, सहकाऱ्यांना निमंत्रित करायचे. पण काही वर्षांनंतर स्टेट डिनर ही पद्धत परदेशी पाहुण्यांच्या सन्मानासाठी ओळखली जाऊ लागली. हवाईचे राजे कालाकुआ हे व्हाईट हाऊसचे स्टेट डिनरसाठी आलेले पहिले परदेशी पाहुणे होते.

स्टेट डिनरची व्यवस्था कशी असते?

स्टेट डिनरचं नियोजन आणि व्यवस्था राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी म्हणजे फर्स्ट लेडी यांचा कर्मचारी वर्ग पाहत असतो. मेजवानीसाठी निमंत्रितांची यादी तयार करणे, जेवणाचा मेन्यू ठरवणे, जेवणाच्या टेबलाची सजावट, मेजवानीवेळी करमणुकीचा कार्यक्रम या सगळ्याचं नियोजन केलं जातं.

 स्टेट डिनरसाठीच्या डायनिंग टेबवर १२० लोक बसू शकतील अशी व्यवस्था असते. तसंच आजूबाजूला इतर छोटे टेबलही असतात. जेवणाचा मेन्यू पाहुण्यांची आवड आणि त्यांच्या धर्माच्या रितींना अनुसरून ठरवला जातो. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेवणासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचे उपवास सुरू असल्याने मोदींनी फक्त कोमट पाणी घेतलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com