लडाख भागात असे काय आहे, ज्यामुळे चीन भारतासोबत घेतोय टक्कर?

3india_china_14.jpg
3india_china_14.jpg

बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात चीनने आपला आक्रमकपणा कायम ठेवला आहे. चीन लडाख भागात इतका रस का घेत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एशिया टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार जगात तिसरे महायुद्ध पाण्यामुळे होईल. सध्या दोन देशांमधील तणाव त्याच दृष्टीने पाहिला जात आहे. 

सगळ्या मोठ्या जलाशयामध्ये एक आहे तिबेट

तिबेट हा खनिजांनी भरपूर असलेला प्रदेश आहे. तिबेटमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचा नैसर्गिक साठा आहे. लडाखमध्ये जेथे चिनी सैनिकांचा ताबा आहे, तेथे कोणताही मोठा पाण्याचा स्त्रोत नाही. तिबेटला आर्कटिक आणि अंटार्टिकानंतर सगळ्यात मोठा जलाशय मानला जातो. याला वॉटर टॉवर ऑफ द वर्ल्ड असेही म्हटलं जातं. येथे शेकडो अशा नद्या आहेत ज्या चीन, दक्षिणपूर्व आशिया आणि दक्षिण आशियाकडे जातात. या नद्या जगातील 45 टक्के लोकसंख्येचा आधार आहेत.  

सिंगापूरच्या इस्ट एशियन इन्स्टिट्यूटमधील संशोधक रायन क्लार्क यांच्या म्हणण्यानुसार, तिबेटमधील नद्या या देशाच्या लाईफलाईन आहेत. त्यामुळे जितक्या जास्त नद्यांवर आपला ताबा ठेवता येईल, तितक्या नद्यांवर चीन ताबा मिळवू पाहात आहे. 

या नद्यांवर अवलंबून आहे चीन

चीन यांगजे आणि पिवळा सागर नदीच्या पाण्याचा वापर उत्तर भागात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी करतो. भूवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार यारलुंग सांगपो नदीचे पाणी शिनजियांगमध्ये घेऊन जाण्याची चीनची योजना आहे. जे नैसर्गिक प्रभावाच्या विरुद्ध आहे. तिबेटमधून यांगजे, पिवळी नदी, सलवीन, इरावडी आणि मेकॉन्ग, सिंधू आणि सतलज नद्या वाहतात. यारलुंग सांगपो भारताच्या उत्तरपूर्वमधून जाते आणि बांगलादेशच्या ब्रह्मपुत्राला मिळून पुढे बंगालच्या आखाताला मिळते. 

औद्योगिकरण आणि पर्यटन क्षेत्रासाठी पेइचिंग ते लेहपर्यंत 1,100 किलोमीटरची रेल्वे लाईन बनवण्यात येत असल्याने बर्फ वितळू लागला आहे. त्यामुळे तिबेटमधील जलाशयातील पाण्याची पातळी आणि गुणवत्ता यामध्ये कमी आली आहे. तिबेटमध्ये यूरेनियम, लीथियम, कॉपर, आयर्न, लिड, झिंक, क्रोमियम, वनेडियम, टायटेनियम, मॅग्नेशियम, सल्फर, ग्रॅफाईड, पॉटॅशियम अशा प्रकारचे 94 खनिजे मिळतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या खनिजांची एकूण किंमत 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. 

दुसरीकडे, भारताचेही उत्तरेकडील नद्यांवर अवलंबित्व अधिक आहे, ज्यांना तिबेटमधून पाणी मिळते. तिबेटमधील साधनसंपत्तीला पाहूनच चीनने 1950 साली प्रदेशावर ताबा मिळवला होता. 1950 च्या दशकात चीनने भारताच्या उत्तर लडाखमध्ये अक्साई चीनच्या 38 हजार स्क्वेअर किमी प्रदेशावर ताबा मिळवला आहे. आता चीनने सिंधू नदीच्या जवळच घुसखोरी केली आहे. चीनने गलवान खोरे, पेंगॉंग आणि हॉटस्प्रिंग येथे घुसखोरी केली आहे.

(edited by- kartik pujari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com