esakal | ज्यांनी जंगलं नष्ट केली, त्यांचा 'सूड' घेण्यासाठी 80 किलोचे उंदीर रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Capybaras

जगभरात अशी अनेक प्रकरणं आहेत, जिथं मानव आपले पाय पसरवण्यासाठी वन्यजीवांचं नुकसान करताना दिसतोय.

ज्यांनी जंगलं नष्ट केली, त्यांचा 'सूड' घेण्यासाठी 80 किलोचे उंदीर रस्त्यावर

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

नॉरडेल्टा | Mice terror in Argentina : जगभरात अशी अनेक प्रकरणं आहेत, जिथं मानव आपले पाय पसरवण्यासाठी वन्यजीवांचं नुकसान करताना दिसतोय. बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपट यासंदर्भात बनली. मात्र, यानंतर कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला दिसला नाही. आता अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स जवळील नॉरडेल्टा शहरातून एक ताजं प्रकरण समोर आलेय. गेल्या काही दिवसांपासून शहरात उंदरांची दहशत अचानक वाढली असून शहरात बनवलेल्या गार्डन्स आणि शोभेच्या वस्तूंची नासदूस हे उंदीर करताना दिसत आहेत. नॉरडेल्टा शहरातील लोक आता उंदरांमुळे त्रस्त झाले आहेत. ते म्हणतात, की अचानक उंदराची संख्या शहरात इतक्या वेगाने वाढलीय, की आता उघड्यावर फिरणं देखील मुश्कील बनलंय.

निसर्गाच्या कुशीत वसलेलं अर्जेंटिना शहर आता विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केलीय. हे सगळं करत असताना शहराचा विस्तार करण्यासाठी जंगले ही नष्ट करत आहे. मात्र, या सगळ्यात वन्यजीवांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. त्यांचा निवारा हिरावून घेतला गेल्याने काही जंगली उंदरांनी मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवला असून नॉरडेल्टा शहरात दहशत माजवायला सुरुवात केलीय. हे उंदीर शहरी भागात शिरुन मानवनिर्मित कलाकृती आणि उद्यानांना हानी पोहोचवत आहेत. शहरातील अनेक पाळीव प्राण्यासोबत हे उंदीर संघर्ष करताना दिसतायत. त्यामुळे नॉरडेल्टाचे नागरिक या घुसखोर शेकडो उंदरांचा बंदोबस्त कसा करायचा या काळजीत आहेत. पहिल्या काही दिवसांत उंदीर पाहून स्थानिक लोक उत्साहित झाले. त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली. परंतु, जेव्हा हे दृश्य सामान्य झालं, तेव्हा येथे राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

हेही वाचा: बीजिंगमध्ये मुसळधार; पावसाच्या पाण्यात तरंगताहेत 'कार'

जगातील या सर्वात मोठ्या उंदरांना कॅपीबरास (Capybaras) असं म्हटलं जातं. त्यांना वैज्ञानिक भाषेत हाइड्रोकोरस हाइड्रोचेरिस (Hydrochoerus hydrochaeris) असंही म्हटलं जातं. अर्जेंटिनातील काही लोक त्याला कारपिन्चोस (Carpinchos) असंही म्हणतात. या उंदरांचा आकार ४ फूट इतका असून वजन 80 किलोग्रॅम आहे. मात्र, हे उंदीर गेल्या काही आठवड्यापासून नॉरडेल्टा शहरात बिनधास्तपणे फिरतायत. नॉरडेल्टा या शहराची लोकसंख्या जवळपास ४० हजार इतकी आहे. मात्र, या शेकडो उंदारांनी येथील लोकांच्या नाकी नऊ आणलेय. येथील अनेक गार्डन्समधील फुलांची झाडे आणि शहरातील शोभच्या वस्तूंची नासदूस करत हे उंदीर रस्त्यावर किंवा शहरात कुठेही घाणं करुन ठेवत आहेत. यामुळे रस्त्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.

Capybaras

Capybaras

loading image
go to top