esakal | कोरोना महामारी केव्हा संपेल? जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

who1.jpg

कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. अशात ही महामारी केव्हा आटोक्यात येईल असे प्रश्न अनेकांना सतावू लागले आहेत.

कोरोना महामारी केव्हा संपेल? जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

जिनिव्हा- कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. अशात ही महामारी केव्हा आटोक्यात येईल असे प्रश्न अनेकांना सतावू लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन वर्षात कोविड-19 (COVID-19)  विषाणू जगातून नष्ट होण्याची आशा आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे ( WHO) प्रमुख टेडरोस अधानो घेब्रेसस यांनी शुक्रवारी जिनिव्हा स्थित मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

दिल्लीत प्रेशर कुकरमध्ये स्फोटकं; ISIS च्या दहशतवाद्याला अटक

डब्ल्यूएचओ प्रमुख्यांनी यावेळी स्पॅनिश फ्लूचाही (Spanish flu) उल्लेख केला. कोरोना महामारी स्पॅनिश फ्लूपेक्षा कमी वेळात नष्ट होऊन जाईल. कोरोना महामारी दोन वर्षांपेक्षा कमी काळात संपण्याची आशा आहे, असं घेब्रेसस म्हणाले आहेत. 1918 मध्ये युरोपात स्पॅनिश फ्लू पसरला होता. त्यावेळी जवळजवळ तीन वर्ष या महामारीची साथ युरोपात होती. याकाळात अनेकांना आपला जीव गमवाला लागला होता.

1918 शी तुलना करता आताचा विषाणू अधिक वेगाने पसरत आहे. देशांनी आता मोठी प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपण खूप पुढे गेलो आहेत. त्यामुळेही हा विषाणू लवकर पसरण्यास मदत झाली. शिवाय तंत्रज्ञानामुळेच आपण या विषाणूवर नियंत्रण मिळवू शकू, असं टेडरोस अधानो घेब्रेसस म्हणाले आहेत. संसाधनांचा अधिक वापर करत आणि लवकरात लवकर कोरोनावर प्रभावी ठरणारी लस मिळवून आपण 1918 मध्ये पसरलेल्या फ्लूपेक्षा कमी वेळात या कोविड-19 विषाणूला संपवू शकू, असंही ते म्हणाले.

भारतात 16 दिवसांत कोरोनाने केला कहर; रुग्ण वाढीचा वेग चिंताजनक

दरम्यान, जगभरात कोरोना महामारीचा हाहाकार सुरुच आहे. सध्या 180 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूने हातपाय पसरले आहेत. सध्या जगभरात 2.26 करोडपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 8 लाखांच्या जवळपास लोकांना या विषाणूने जीव घेतला आहे. अमेरिका कोरोनाने सर्वाधिक प्रभावी देश ठरला आहे. त्यापाठोपाठ ब्राझीलचा क्रमांक आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात 54 हजारांपेक्षा अधिक लोकांना मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असली तरी देशात सध्या 7 लाख सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे एका दिवसात भारतात अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाअधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. 

(edited by- kartik pujari)

loading image