रुग्णाचा अजब दावा; व्हिस्की पिऊन झालो कोरोनामुक्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

आपल्याला कोरोना व्हायरस झाला होतो तेव्हा आपण व्हिस्की आणि मध पिऊन स्वत:वर उपचार केले, असा दावा कॉनर रीड त्यांनी केला आहे.

बीजिंग : चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत 490 लोकांचा बळी घेतला आहे, तर कित्येक रुग्ण रुग्णालयात जीवनमृत्यूशी झुंज देत आहेत. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना व्हायरसला मारक असं औषध मिळावं यासाठी शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू आहे. अद्यापपर्यंत तरी कोरोना व्हायरसवर उपचार करता येईल असं कोणतंही औषध सापडलं नाही. मात्र वुहानमधल्या एका ब्रिटिश नागरिकाने आपण कोरोना व्हायरसवर उपचार केल्याचा दावा केला आहे.

कॉनर रीड असं या व्यक्तीचं नाव आहे. कॉनर हे ब्रिटिश असून गेल्या 3 वर्षांपासून ते चीनमध्ये राहतात. वुहानमध्ये ते शिक्षक आहेत. आपल्याला कोरोना व्हायरस झाला होतो तेव्हा आपण व्हिस्की (whisky) आणि मध (Honey) पिऊन स्वत:वर उपचार केले, असा दावा त्यांनी केला आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार रीड यांना फ्लू आणि न्युमोनिया होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॉनर यांनी द सनला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते तपासणीसाठी गेले तेव्हा त्यांना खोकलाही येत होता. तब्बल 2 आठवडे ते रुग्णालयात होते, मात्र त्यांनी डॉक्टरांनी दिलेले अँटीबायोटिक्स घेतले नाहीत. श्वास घेता यावा यासाठी त्यांनी आपलं इनहेलर वापरलं आणि अँटिबायोटिक्स न घेता गरम व्हिस्की आणि मध घेतलं.

चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या 490 झाली आहे आणि 24,324 जणांना याची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 65 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हे सर्व हुबेई प्रांत आणि वुहानमधील आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whisky honey treated coronavirus china british person claimed health up