Indian Company : भारतातील 'या' कंपनीची 4 औषधं धोकादायक; 66 मुलांच्या मृत्यूनंतर WHO कडून अलर्ट जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maiden Pharmaceuticals Limited

मेडेन फार्मास्युटिकल्सनं यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

Indian Company : भारतातील 'या' कंपनीची 4 औषधं धोकादायक; 66 मुलांच्या मृत्यूनंतर WHO कडून अलर्ट जारी

Indian Cough Syrup Company : जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization WHO) भारतीय कंपनी मेडेन फार्मास्युटिकल्सनं (Maiden Pharmaceuticals Limited) बनवलेल्या चार खोकला आणि सर्दी सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. या कफ सिरपमुळं गाम्बिया (Gambia) देशातील 66 मुलांचा मृत्यू झाला असू शकतो, असं संस्थेनं म्हटलंय.

आरोग्य संघटनेनं आपल्या वैद्यकीय अहवालामध्ये म्हटलंय की, प्रयोगशाळेत चार उत्पादनांच्या नमुन्यांचं विश्लेषण करण्यात आलं, ज्यानं पुष्टी केली की या उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलची अस्वीकार्य मात्रा आहे. त्यानंतर डब्ल्यूएचओनं इशारा दिला की, ही उत्पादनं इतर देशांमध्ये देखील वितरित केले जाऊ शकतात. या प्रकरणाबाबत डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले, या चार औषधांमध्ये मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेडनं भारतात बनवलेल्या खोकला आणि सर्दी सिरपचा समावेश आहे. डब्ल्यूएचओ रुग्णांना पुढील हानी टाळण्यासाठी सर्व देशांमध्ये अशी उत्पादनं शोधून काढून ती टाकण्याची शिफारस करतो, असं नमूद केलंय.

हेही वाचा: Telangana : राष्ट्रीय राजकारणात KCR यांची दमदार एन्ट्री; स्वत: च्या पक्षाचं नाव बदलून दिलं 'हे' नवं नाव

भारती कंपनीशी संबंधित सर्दी आणि खोकल्याचे चार सिरप हे मुत्रपिंडाच्या गंभीर दुखापती आणि 66 मुलांच्या मृत्यूशी संबधित आहे. रिपोर्टनुसार बुधवारी या औषधांबाबत आणि त्यामुळं होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल इशारा जारी केला आहे. ज्या चार सिरपबाबत इशारा दिला आहे, त्यात प्रोमेथाजिन ओरल सोल्युशन, कोफेक्समालिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरपचा समावेश आहे.

हेही वाचा: VIDEO : दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना; पुरात 8 जण बुडाले, 40 लोक बेपत्ता

औषध कंपनीनं WHO ला औषधांच्या सुरक्षा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तपासात असं समोर आलं की, या सिरपमध्ये मर्यादेपेक्षा जास्त डायथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलचा वापर केला गेला आहे. औषधांमध्ये ज्या पदार्थांचा वापर केला गेला ती विषारी आणि धोकादायक ठरू शकतात. या औषधांच्या सेवनामुळं पोटात दुखणे, उलटी, मूत्रपिंडाचा आजार, डोकेदुखी इत्यादी त्रास होऊ शकता. यामुळं मृत्यू होण्याचीही शक्यता आहे. गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये गाम्बियामध्ये साठ मुलांचा मृत्यू झाला होता. खोकल्याचे कोणतेतरी सिरप प्यायल्यानंतर या मुलांच्या किडनीच्या समस्या समोर आल्या. सध्या या मृत्यूमागील कारणांचा शोध सरकार घेत आहे. डब्ल्यूएचओनं म्हटलंय की, ते भारतातील कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत या प्रकरणाची चौकशी करत आहे. मेडेन फार्मास्युटिकल्सनं यावर भाष्य करण्यास नकार दिलाय.

टॅग्स :Indiawhowho chief