esakal | कोरोनाच्या लाटेमध्येही भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत - RBI

बोलून बातमी शोधा

Indian-Economy
कोरोनाच्या लाटेमध्येही भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत - RBI
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ चांगल्या प्रकारे सुरु असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. परंतू, संसर्गाची जोखीम वाढल्याने निर्बंधांमुळे महागाईचा दबाव वाढत असल्याचंही आरबीआयनं म्हटलं आहे.

हेही वाचा: "लसींच्या किंमती कमी करा"; केंद्राचं 'सीरम' आणि 'भारत बायोटेक'ला आवाहन

आरबीआयनं म्हटलं, "संपर्क केंद्रीत क्षेत्रांव्यतिरिक्त, सक्रीय क्षेत्रे मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात लवचिक राहिली आहेत आणि त्यामुळे व्यवसायांवर परिणाम होण्याऐवजी कोरोनाच्या तीव्र संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील व्यावसायांच्या सर्व स्तरांत वाढ झाली आहे"

हेही वाचा: आता घरातही मास्क वापरण्याची आली वेळ - नीती आयोग

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काही राज्यांत अजूनही स्थानिक लॉकडाउन सुरु आहेत. या कठोर नियमांमुळे पुरवठा साखळी खंडीत होऊ शकते आणि त्यामुळे सन २०२० मध्ये महागाईच्या चिंतेत भर पडू शकते. आरबीआयला आशा आहे की, लवकरच कॉर्पोरेट कमाई, क्षमतांचा वापर आणि वीज वापरात झालेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेतील आर्थिक मिळकत कायम राहील.

बाजाराला प्रोत्साहन मिळणं आवश्यक

आरबीआयनं म्हटलं की, "या सकारात्मक मासिक घडामोडींमुळे एकमेकांना बळकटी मिळते आणि मध्यम मुदतीच्या कालावधीत वाढ होते. देशाच्या धोरणकर्त्यांना माहिती आहे की, अशा बिकट काळात त्वरीत बाजाराला प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे महागाईच्या भीतीपेक्षा त्यावरील दबाव कमी होण्याची भीती कमी आहे. म्हणूनच बहुतेक केंद्रीय बँका महामारीच्या काळात वाढीच्या दिशेने झुकल्या आहेत.